Jalgaon Leopard News: शिरसोलीत 2 दिवसांपासून फिरतोय बिबट्या

Leopard
Leopardesakal

जळगाव : शिरसोली (ता. जळगाव) गावठाण शिवारातील शेतात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या भितीमुळे रात्री शेतात पाणी सोडण्यासही शेतकरी घाबरत आहेत. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिसपाटील श्रीकृष्ण बारी यांनी केली आहे.

Leopard
Leopard : एक महिन्या पासून बिबट्या वनविभागाला देतोय गुंगारा

शिरसोली गावात राहणारे शेतकरी प्रभाकर शिंदे, आंबटकर व त्यांचा मुलगा शनिवारी (ता. १८) रात्री नऊनंतर त्यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना रस्त्याने एक बिबट्या जाताना दिसून आला.

समोरून बिबट्या दिसल्याने शिंदे-आंबटकर वेळीच सावध झाले. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला असता, तर बाका प्रसंगच ओढवला होता. मात्र, नशिब बलवत्तर असल्याने त्यांच्यावर हल्ला झाला नाही. त्यांनी तातडीने गावात येऊन घटनेची माहिती दिली. पोलिसपाटील श्रीकृष्ण बारी यांनी याबाबत वन विभागाला भ्रमणध्वनीवरून बिबट्या फिरत असलेल्या शिवाराची माहिती दिली.

Leopard
Leopard Calf : ताटातूट झालेला बिबट बछडा आईच्या कुशीत

बिबट्याची दहशत

जळगाव शहरापासून अवघ्या दहा ते २० किलोमीटरवर असलेल्या शिरसोली गावाजवळील शेतांमध्ये बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. रात्री बेरात्री फुल शेती व भाजीपाला लावलेल्या शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. तसेच रात्रपाळी संपवून चाकरमाने घराकडे परतत असताना, रस्त्यांवर आंधार असतो.

अचानक लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविला, तर अशी शंका ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. कारण आठवड्यापूर्वीच तालुक्यातील बेळी येथे एका बिबट्याने दोन शेळ्यांचा पडशा पडला होता.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

तोच बिबट्या शिरसोलीच्या शेतांमध्ये फिरत असल्याची शंका शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे रात्री शेतात जाण्यासाठी शेतकरी घाबरत आहेत. वन विभागाने याची दखल घेत तातडीने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी पोलिसपाटील श्रीकृष्ण बारी यांनी केली आहे.

Leopard
Leopard Calf Found : शेतात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळल्याने परिसरात घबराट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com