Leopard Attack News : पशुधनांवर हिंस्र प्राण्यांचे हल्ले सुरूच

Leopard
Leopardesakal

Jalgaon News : वरखेडे- दरेगाव रस्त्यावरील शेतातील खळ्यातील जाळीत बंदिस्त बकऱ्यांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्याची घटना ताजी असताना तेथून अर्धा किलोमीटर अंतरावरील दरातांडा (ता. चाळीसगाव) येथेही तीन शेळ्यांचा फडशा पाडला. (leopard kill 3 goats jalgaon news)

हिंस्त्र प्राण्याच्या या हल्ल्यात एक शेळी गंभीर जखमी झाली असून पशुधनांवर हे हल्ले करणारा बिबट्याच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून वन विभागाने त्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

परिसरात असलेली गिरणा नदी व काहीसा जंगलाचा भाग यामुळे या भागात बिबट्यासह इतरही हिंस्त्र प्राण्यांचा वावर कायम असतो. या भागात आतापर्यंत अनेकदा बिबट्यानेच पशुधनांवर हल्ले केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरातांडा येथील साईलाल लक्ष्मण राठोड यांचे डोंगऱ्याच्या कडेला असलेल्या शेतातील गोठ्यात पाच बकऱ्या बांधलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास बंदिस्त जाळीच्या खालून बिबट्याने पायाच्या नखांनी माती कोरून जाळीच्या आत प्रवेश केला व तीन बकऱ्यांचा फडशा पाडला. बिबट्याच्या हल्ल्यात एक बकरी जखमी झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Leopard
Bus Stand Renovation : अमळनेर बसस्थानकाचा होणार कायापालट; स्वच्छ, सुंदर अभियानात सक्रिय सहभाग

आज पहाटे नेहमीप्रमाणे प्रसाद राठोड हे शेतात गेले असता, त्यांच्या या प्रकार लक्षात आला. हा हल्ला नेमका बिबट्यानेच केल्याच्या वृत्ताला वन विभागाकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी हे हल्ले बिबट्याच करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वनविभागाकडून पंचनामा

बकऱ्यांचा फडशा पाडल्याची माहिती तांड्यावर कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरातांडा ही अवघ्या १५ ते २० घरांची लोकवस्ती आहे. या हल्ल्यामुळे सर्व रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. वन विभागाला या घटनेची माहिती दिल्यानंतर वनपाल श्रीराम राजपूत येऊन घटनेचा पंचनामा केला.

काही दिवसापूर्वी माळ भागात बिबट्याचे दर्शन झाले होते. वरखेडे येथील सागर कच्छवा या शेतकऱ्याच्या वरखेडे-दरेगाव रस्त्यालगतच्या शेतातील जाळ्यातून दोन बकऱ्यांचा फडशा पाडल्याचा प्रकार घडून दोन दिवस होत नाही, तोच आज दरातांडा येथेही तीन बकऱ्यांना बिबट्याने ठार केल्याच्या घटनेमुळे परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत पसरली आहे. वन विभागाने या घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.

Leopard
Ideal Marriage : पारंपरिक रूढी, परंपरांना आळा; भिल्ल समाजाचा आदर्श विवाह!

वन विभागाची ‘वेबसाईट’ बंद

हिंस्र प्राण्यांकडून पशुधनावर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी वन विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ही वेबसाईट अनेकदा बंद असल्याचा अनुभव यापूर्वी देखील अनेक शेतकऱ्यांना आलेला आहे. त्यामुळे या वेबसाईटचा तीन- चार महिन्यांपासून काहीही एक उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या वेबसाईटवर माहिती पूर्णपणे भरली जाते. मात्र, ‘सबमिट’ केल्यानंतर शेतकऱ्यांची माहिती स्वीकारली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वन विभागाने कार्यालयातच शेतकऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Leopard
Jalgaon News : जोगलखोरी-वराडसीम बससेवा अखेर सुरू; विद्यार्थी, ग्रामस्थांची झाली सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com