Jalgaon News : विचखेडा शिवारात शॉर्टसर्किटमुळे मक्यासह चारा खाक | Maize fodder loss due to short circuit in Vichkheda Shivar jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maize fodder loss due to short circuit in Vichkheda Shivar

Jalgaon News : विचखेडा शिवारात शॉर्टसर्किटमुळे मक्यासह चारा खाक

Jalgaon News : अनवर्दे खुर्द (ता. चोपडा‌) येथील शेतकरी जगदीश रंगराव बोरसे यांच्या मालकीच्या विचखेडा शिवारातील गट क्रमांक १३३/२ मध्ये काढणीला आलेल्या मका पिकाच्या शेतात अचानक ट्रान्सफॉर्मरवरील शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून एक हेक्टर शेतातील मक्यासह चारा जळून खाक झाला. (Maize fodder loss due to short circuit in Vichkheda Shivar jalgaon news)

घटनेची माहिती घेऊन तलाठी गजानन पाटील यांनी एक हेक्टर क्षेत्रावरील मका जळून शंभर टक्के नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी करून पंचनामा केला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची भेट घेतली. नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदतीची मागणी उर्वेश साळुंखे यांनी केली आहे. उमेश बोरसे, रामकृष्ण धनगर, समाधान धनगर आदी उपस्थित होते.