किडनीच्या आजाराला कंटाळून आत्महत्या

किडनीच्या आजाराला कंटाळून असोद्यातील भोळेनगरात राहणाऱ्या एकाने घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
Husband arrested
Husband arrestedesakal

जळगाव : किडनीच्या आजाराला कंटाळून असोद्यातील भोळेनगरात राहणाऱ्या एकाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेपूर्वी घडली. संतोष प्रभाकर अट्रावलकर असे मयताचे नाव आहे.

आसोदा (ता. जळगाव) येथील भोळेनगरात संतोष अट्रावलकर कुटूंबासह वास्तव्यास होते. मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना किडनीचा त्रास जाणवत होता. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कामावरून परतल्यानंतर त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गल्लीत खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस नाईक साहेबराव पाटील, माणिक सपकाळ अशांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Husband arrested
पाणी भरण्यावरून वाद; एकाचा मृत्यू, तीन जखमी
Husband arrested
अमळनेर तालुक्यात वादळासह पाऊस, गारपीट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com