Birthday Story: एक वाढदिवस असाही! कुठलही सेलिब्रेशन न करता त्यांनी बुजवले खड्डे; नागरिकांकडून कौतुक

Birthday Story Jalgaon
Birthday Story Jalgaonesakal

पाचोरा : अलीकडच्या काळात हटके वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार व प्रमाण दिवसागणिक वाढत असलेले आपण पाहतो. वाढदिवसानिमित्त रंगीत संगीत पार्ट्यांसह जल्लोष करण्याची मनोवृत्तीही विकसित होत असल्याचे दिसते.

असे असताना येथील युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही गाजावाजा अथवा कार्यक्रम न करता वर्दळीच्या असलेल्या गो. से. हायस्कूल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा संकल्प केला व राजे संभाजी रेल्वे भुयारी मार्गापासून ते गो. से. हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावरील सुमारे वीस खड्डे सिमेंट, खडी व रेतीने बुजून रस्ता वाहतूक योग्य केला. या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Birthday Story Jalgaon
Jalgaon News : चोपड्यात सांज पाडव्याची मैफल रंगली

गो. से. हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून खड्डे पडले होते. रस्त्यावरील सततच्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे रस्त्यांची लांबी, रुंदी व खोली वाढत होती. रात्रीच्या अंधारात तर या खड्ड्यांवरून दुचाकी घसरून अपघातही वाढले होते. रस्ते चुकविण्याच्या प्रयत्नातही अपघात वाढले होते.

विशेष म्हणजे हा रस्ता गो से हायस्कूल, न्यायालय, रेल्वे स्थानक, वीज मंडळ कार्यालयासह गिरड कडे जाणारा रस्ता असल्याने येथून विद्यार्थी, कर्मचारी ,अपडाऊन करणाऱ्यांची दिवस रात्र वर्दळ असते. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती.

Birthday Story Jalgaon
Jalgaon News : पालिकेची वसुलीची धडक मोहीम; पाचोऱ्यात सतरा गाळे सील

परंतु कार्यवाही होत नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप जैन यांनी अनिल येवले यांची खड्डे बुजण्याची मागणी पूर्ण करण्याचा संकल्प केला व शुक्रवार (ता. २०) आपल्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून दुपारपर्यंत या रस्त्यावरील सुमारे २० खड्डे सिमेंट खडी व वाळूने बुजवण्यात आले.

त्यामुळे हा रस्ता वाहतूक योग्य झाला असून, खड्ड्यांमुळे होणारे अपघात व हानी टळली आहे. संदीप जैन यांच्या या अनोखा उपक्रमाचे कौतुक होत आहे. याप्रसंगी संदीप जैन, भूपेश सोमवंशी, हरीश देवरे ,संतोष पाटील, प्रशांत सोनार, जगदीश महाजन, नितीन खरे, अनिल येवले, निखिल मोर, महावीर गौड, वहीम शेख, सुलतान पिंजारी, पप्पू पाटील, बंडू मराठे आदी उपस्थित होते.

Birthday Story Jalgaon
Jalgaon News : नागपूर पुणे, नांदेड एक्सप्रेसला आता शेगावला हॉल्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com