बिबट्याच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

गायी चारत असताना गुराख्यावर बिबट्याने हल्ला चढवला
leopard
leopardesakal

रावेर (जि. जळगाव) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मध्यप्रदेश हद्दीजवळील तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ गायी चारत असताना गुराख्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. प्रकाश तेरसिंग भिलाला (वय २७ वर्षे) असे जखमी युवकाचे नाव असून, शनिवारी (ता. ४) सकाळी ही घटना घडली. जखमी युवकास जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्रकाश हा मंगरूळ गावातील मध्यम प्रकल्पाजवळ असलेल्या मध्य प्रदेशातील गरताड शिवाराजवळ ५० ते ६० गायी घेऊन गेला. गायी आणि वासरांमध्ये पळापळ झाल्याने तो पाहायला गेला असता अचानक त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. प्रकाशने प्रसंगावधान राखून आपल्या दोन्ही हातात कुऱ्हाडीचा दांडा असलेली काठी धरून ठेवून बिबट्याचा प्रतिकार केला. त्याच्यासोबत असलेल्या कुत्र्याने देखील भुंकून त्याचा प्रतिकार केला. यामुळे अखेर बिबट्या प्रकाशला सोडून जंगलात पळून गेला. मात्र त्यापूर्वी बिबट्याने त्याच्या डोक्यावर आणि दंडावर खोल जखमा केल्या. मदतीसाठी परिसरात दुसरे कोणीही नसल्याने तशाच जखमी अवस्थेत गायी घेऊन प्रकाश गावाकडे परत आला. त्याला प्रमोद वानखेडे यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यास जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे. त्याच्या हाताच्या दंडावर आणि गळ्याजवळही जखमा झाल्या आहेत. पोलिस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

सुमारे तीन वर्षांपूर्वी प्रकाश अशाच प्रकारे गुरे चारत असताना त्याच भागात बिबट्याने हल्ला केला होता.

leopard
पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
leopard
Flipcart च्या कस्टमरला तक्रार भोवली; खात्यावर पडला डाका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com