भुसावळला यात्रेत चेंगराचेंगरी; बारागाड्यांखाली येऊन एक जण ठार

jalgaon
jalgaonesakal

भुसावळ (जि. जळगाव) : शहरातील सतारे भागातील ग्रामदैवत मरिमातेच्या यात्रोत्सवानिमित्त शनिवारी (ता. २) सायंकाळी साडेसहाला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमचा समारोप होत असताना बारा गाड्यांखाली चेंगरुन एक जण ठार तर सहा जण जखमी झाले. गुढीपाडव्याच्या आनंदात असताना ही दुर्घटना घडल्याने शहरात शोककळा पसरली.

सणावर शोककळा

गुढीपाडव्यानिमित्त मरिमाता यात्रोत्सवाची शतकोत्तर वर्षांची परंपरा आहे. जळगाव रोडवरील जुना सतारे भागातील मरिमाता मंदिराजवळ बारागाड्या ओढल्या जातात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे यात्रोत्सव भरविण्यात आला नव्हता. मात्र, यंदा कोरोनाचे निर्बंध हटविल्याने यात्रेत मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली. या गर्दीमुळे बारागाड्या ओढताना झालेल्या चेंगराचेंगरीत १ जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली.

jalgaon
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यास म्हसदीतून अटक

उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

बारागाड्या धावत असताना काही लोक चाकाखाली दाबले गेले. यात कुणाच्या पोटावरून तर कुणाच्या हातापायांवरून गाड्यांचे चाके गेली. घटना घडताच जखमींना गाड्यांखालून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गिरीष कोल्हे यांचा गोदावरी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. छोटू इंगळे (वय ३३), धर्मराज कोळी (वय ६३), मुकेश यशवंत पाटील (वय २८), नितीन फेगडे (वय ४०) दीपक कोळी यांसह आणखी एक जण जखमी झाला आहे. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळपासून विविध कार्यक्रम

मरिमाता मंदिरात शनिवारी सकाळी अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम झाले तर सायंकाळी साडेसहाला जळगाव रोडवरील मरिमाता मंदिरापासून बारागाड्या ओढल्या. तत्पूर्वी ग्रामदैवताला भगतांकडून गाव प्रदक्षिणा काढण्यात आली . दरम्यान, यात्रोत्सवात गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. या भागातील वाहतूक दुपारनंतर थांबविण्यात आली होती. पोलिसांकडून या भागात बॅरिकेटींग करण्यात आले तसेच यावल व रावेरकडून येणारी वाहने अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. तसेच साकेगाव तसेच वरणगावकडून येणारी वाहनेदेखील अन्य मार्गाने वळविण्यात आली होती.

jalgaon
जळगाव : मुक्‍या बापाची याचनाही प्रशासनासमोर हरली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com