esakal | ज्येष्ठ नागरीकांना खासगी रुग्णांलयात लसीकरण; जळगावात उद्यापासून सुरवात 

बोलून बातमी शोधा

co vaccine}

जिल्ह्यात सध्या शासनानतर्फे कोरोना युध्दात फ्रंटलाईनवर असलेल्या वैद्यकीय, महसूल, पोलिस क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू आहे. दूसऱ्या टप्प्यातील हे लसीकरण आहे.

ज्येष्ठ नागरीकांना खासगी रुग्णांलयात लसीकरण; जळगावात उद्यापासून सुरवात 
sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : केंद्र शासनाने एक मार्चपासून जरी ज्येष्ठांचे लसीकरण करण्याची घोषणा केली असली तरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात मात्र एका आठवड्यानंतर ज्येष्ठांना लस देण्यात येणार आहे. या आठवड्यात ज्या कोरोना योध्यांचे लसीकरण बाकी आहे अशांना लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र शासनाच्या योजनांनूसार आरोग्य सुविधेचा लाभ देणाऱ्या खासगी रुग्णालयांत उद्यापासून (ता.१) लसीकरण सूरू होणार आहे. 
जिल्ह्यात सध्या शासनानतर्फे कोरोना युध्दात फ्रंटलाईनवर असलेल्या वैद्यकीय, महसूल, पोलिस क्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू आहे. दूसऱ्या टप्प्यातील हे लसीकरण आहे. यात अजूनही अनेक कोरोना योध्दे बाकी आहे. त्याचे लसीकरण १ ते सात मार्च दरम्यान होणार आहे. 

कोविन ॲपवर करावी लागणार नोंदणी
ज्येष्ठ नागरिकांना शासनातर्फे कोरोना लसीकरण होणार आहे. त्यासाठी त्यांना कोविन ॲपवर आपली नाव नोंदणी करून आधारकार्ड क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. दरम्यानच्या काळात जिल्हा रुग्णालयात लसीचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठांना मोफत लसीकरण होणार आहे. 

खासगी रुग्णालयांना मान्यता 
शहरासह जिल्ह्यात ज्या खासगी रुग्णालयात शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, पंतप्रधान जनआरोग्य योजना आदी योजनांद्वारे रु्ग्णांवर उपचार केले जातात. अशा रुग्णांना कोरोना लसीकरण सेंटरचा दर्जा देण्यात आला आहे. ज्येष्ठांना या रुग्णालयात जावून कोरोनाची लस घेतली तरी चालेल. त्यासाठी त्यांना २५० रूपये रुग्णालयात (१५० रूपये व्हक्सीन शुल्क, १०० रूपये सर्व्हीस चार्ज) द्यावे लागतील. खासगी रुग्णालयांनी रूग्णांकडून घेतलेली ही रक्कम स्टेट बँकेत भरावी लागणार आहे. 

ज्येष्ठांची कोविन ॲपद्वारे उद्यापासून (ता.१) नोंदणी होणार आहे. याआठवड्यात कोरोना काळात अग्रभागी असलेल्यांना कोरोना लस दिली जाईल. ज्येष्ठांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालये किंवा ठरवून दिलेल्या केंद्रात लसीकरण होईल. 

- अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी 

संपादन ः राजेश सोनवणे