अहमदाबाद- हावडा एक्सप्रेसवर ट्रक आदळला 

ahamdabad hawda express
ahamdabad hawda express

अमळनेर (जळगाव) : तालुक्यातील भोणे गावाजवळ रेल्वे ट्रॅकचे काम सुरू आहे. खडीने भरलेला डंपर ट्रॅकच्या बाजूला होता. कामगारांच्या बेफिकीरीमुळे अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेस जळगावकडे जात असताना भरलेला ट्रक घसरून रेल्वेवर जाऊन धडकला. 
भुसावळ- सुरत दरम्‍यान तिसऱ्या रेल्‍वेलाईनचे काम सुरू आहे. अमळनेर दरम्‍यान काम सरू आहे. या दरम्‍यान भोणे गावाजवळ रेल्‍वे ट्रॅकवरून अहमदबाद- हावडा एक्‍स्‍प्रेस जळगावकडे जात असताना खडीने भरलेला ट्रक आदळला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी आणि वित्त हानी झाली नाही. मात्र, काही वेळ हावडा एक्सप्रेस खोळंबली. 

तर घडला असताना अनर्थ.
जेसीबीने डंपर खाली करून ट्रकमागे सरकवण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. ठेकेदार अथवा कामगारांच्या बेफिकीरीने हा प्रकार घडला आहे. एक्सप्रेस लगेच थांबल्याने मोठा अपघात टळला. अचानक झालेल्या या घटनेने प्रवासी भयभीत झाले होते. अनेक प्रवासी खाली उतरून काय झाले ते पाहत होते. परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणाने ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. ट्रक बाजूला झाल्यानंतर रेल्वे पुढे रवाना झाल्याने प्रवाशांनी निश्वास सोडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com