अमळनेरकरांना दिलासा; करवाढ टळली, अंदाजपत्रकास मंजुरी 

amalner palika
amalner palika

अमळनेर (जळगाव) : येथील पालिकेच्या झालेल्या विशेष ऑनलाइन सभेत कोणतीही करवाढ न करता १३५ कोटी रुपयांच्या पाचव्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात असून, हे २ कोटी ४४ लाख रुपये शिलकी अंदाजपत्रक आहे. या वेळी २०२०-२१ चे सुधारित अंदाजपत्रक व २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. 
पालिका अंदाजपत्रकासाठी विशेष ऑनलाइन सभा घेण्यात आली. नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील पीठासन अधिकारी होत्या. प्रभारी मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांचे उपस्थितीत लेखापाल चेतन गडकर यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. अंदाजपत्रकात महसुली जमा रक्कम ५४ कोटी १२ लाख रुपये, महसुली खर्च रक्कम ५४ कोटी १२ लाख, भांडवली जमा रक्कम ८० कोटी ८७ लाख, भांडवली खर्च रक्कम रुपये ७८ कोटी ४३ लाखासह रक्कम रुपये २ कोटी ४४ लाख शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये विशेषतः कोणतीही करवाढ प्रस्तावित नसून आहे. त्याच करामधून जास्तीत जास्त वसुलीवर भर देऊन प्राप्त निधीतून कामे प्रस्तावित केलेली आहे. 

विविध विषयांवर चर्चा
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून भुयारी गटारचे योजनेचे काम डिसेंबर २०२१ पर्यत पूर्ण करून घेण्याचा मानस आहे. तसेच शहरातील भुयारी गटार प्रकल्प सुरू असलेल्या कामाची लांबी फक्त ७० किलोमीटर असून, शहरातील एकूण रस्त्यांची लांबी १६० किलोमीटर असल्याने उर्वरित ९० किलोमीटरचे सर्वेक्षण झाले असून, वाढीव प्रकल्प आराखडा शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच शहरासाठी कपिलेश्वर, निम, अथवा कलाली येथून २४ बाय ७ पाणीपुरवठा करणे कामी पुढील ३० वर्षांचा आराखडा तयार करून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. आरोग्य व पाणीपुरवठा या सुविधेवर भर देण्यात येणार आहे. या सोबतच भुयारी गटार योजनेमुळे रस्ते खराब झाले आहेत. ते दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पुष्पलता पाटील यांनी सांगितले. 

कोरोनामुळे उत्पन्नात घट 
दरम्यान, २०२०-२१ मध्ये कोविड-१९ या सारख्या महामारीचा प्रादुर्भाव झाला. गेल्या वर्षी नेमका मार्च २०२० ला लॉकडाउन लागल्यामुळे मालमत्ता कर वसुलीवर देखील परिणाम झाला. अत्यंत कमी उत्पन्नामध्ये पालिकेने या महामारीवर उपाययोजना केली. या सर्व परिस्थितीमध्ये आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील यासह विरोधीपक्ष नेते, सभापती, सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com