महामार्गावर अपघात; एकाचा जागीच मृत्‍यू, अन्य एक जखमी

महामार्गावर अपघात; एकाचा जागीच मृत्‍यू, अन्य एक जखमी
road accident
road accidentroad accident

जळगाव : अज्ञात वाहनाने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्वाराचा (Road accident news) जागीच मृत्‍यू तर सोबत असलेला एक जण जखमी झाल्याची घटना बांभोरीजवळ महामार्गावर घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bambhori-village-highway-bike-accident-one-death)

road accident
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी विसरले पाढे- उजळणी!

जळगाव शहरातील टिपू सुलताननगर (तांबापूरा) येथील रहिवासी असलेलाप शाहिद शकिल बागवान (वय २२) हा आई- वडील आणि तीन बहिणींसोबत वास्‍तव्यास आहे. तो शहरात आंबे विक्री व किरकोळ व्यापारीचे काम करायचा. तर त्यांचे वडील त्याला हातभार लावत होते. शाहिद हा मित्रासह दुचाकीने पाळधी येथे वसुलीसाठी जात होते.

बसस्‍थानकाजवळ अपघात

गिरणा नदीवरील पुल ओलांडून बांभोरी बसस्थानका जवळ आले असताना अज्ञात वाहनाने त्‍यांना जोरदार धडक दिली. यात शाहिद बागवान हा जागीच ठार झाला. तर सोबत असलेला त्‍याचा मित्र जखमी झाला आहे. जखमीला शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शाहिदचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. सकाळी शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com