‘यास’ चक्रीवादळाची धास्ती; मध्य रेल्वेतर्फे १५ गाड्या रद्द

‘यास’ चक्रीवादळाची रेल्वेला धास्ती; मध्य रेल्वेतर्फे १५ गाड्या रद्द
indian railway
indian railwaysakal

भुसावळ (जळगाव) : लवकरच पूर्व भारताला धडक देण्याच्या तयारीत असलेल्या ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रशासनाने (Indian railway) काही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने (center railway yaas hurricane) ३० मेदरम्यान चालणाऱ्या १५ गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. यात पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. (jalgaon-news-bhusawal-center-railway-cancel-yaas-hurricane)

ओडिशा आणि बंगालच्या खाडीत ‘यास’ या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मध्य रेल्वेने १५ गाड्या रद्द केल्या आहेत. यात मंगळवारी (ता. २५) सुटणारी ०२२७९ पुणे हावडा विशेष, मंगळवारी आणि बुधवारी (ता. २६) सुटणारी ०२२८० हावडा पुणे विशेष, ०२८३४ हावडा अहमदाबाद विशेष, ०२८१० हावडा मुंबई विशेष, मंगळवारी आणि शुक्रवारी (ता. २९) सुटणारी ०२८३३ अहमदाबाद हावडा विशेष, शुक्रवारी सुटणारी ०२८०९ मुंबई हावडा विशेष, मंगळवारी सुटणारी ०२२५९ मुंबई हावडा विशेष, ०२९०६ हावडा ओखा विशेष,०२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- हावडा, ०२१०१ लोकमान्य तिलक टर्मिनस- हावडा विशेष, बुधवारी सुटणारी ०२२६० हावडा मुंबई विशेष, रविवारी (ता. ३०) सुटणारी ०२९०५ ओखा हावडा विशेष, ०२२५५ लोकमान्य टिळक टर्मिनस कामख्या विशेष, गुरुवारी (ता. २७) सुटणारी ०२८१० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष, ०२०१० हावडा- लोकमान्य तिलक टर्मिनस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

indian railway
जळगावातील दुकाने सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय

भुसावळ-पुणे विशेष गाडीत बदल

रेल्वे प्रशासनाने भुसावळ- पुणे- भुसावळ विशेष गाडीमध्ये बदल केला आहे. ही गाडी आता पुणेऐवजी दौंडपर्यंत चालविण्यात येईल. २७ ते २९ जुलैपर्यंत हा बदल केला आहे. ०११३५ ही गाडी भुसावळ येथून दर गुरुवारी सव्वासहाला सुटेल आणि त्याच दिवशी दौंड येथे दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल. ०११३६ ही गाडी दौंड येथून दर गुरुवारी साडेबाराला सुटेल आणि त्याच दिवशी भुसावळ येथे रात्री पावणेनऊला पोहोचेल. या गाडीला जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर येथे थांबा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com