लसीकरण केंद्रच ठरताहेत संसर्गाचा केंद्रबिंदू; लसीसाठी उसळतेय अनियंत्रित गर्दी

लसीकरण केंद्रच ठरताहेत संसर्गाचा केंद्रबिंदू; लसीसाठी उसळतेय अनियंत्रित गर्दी

भुसावळ (जळगाव) : शहरात मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. लसीकरणाची (Vaccination) यंत्रणा पाहता यंत्रणेच्या तुलनेत लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. केंद्रावर पहाटेपासून लांबलचक रांगा लागत असून, वाद निर्माण होत आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. केंद्रावर (Covid center) कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे निदर्शनास येत आहे. केंद्रांवर होणाऱ्या गर्दीतूनच कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत याठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसे न झाल्यास लसीकरण केंद्र संसर्गाचा केंद्रबिंदू होतील, असा धोका दिसून येत आहे. (corona spread in covid center vaccination crowd)

लसीकरण केंद्रावर वाढती गर्दी लक्षात घेता, योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यामध्ये लसीचा पुरवठा वाढविणे, प्रत्येक येणाऱ्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करणे, होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सामाजिक संस्थांची मदत घेणे, अन्य सुरक्षिततेच्या उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

नागरीकांमध्‍ये संताप

शहरातील बद्री प्लॉट व महात्मा फुले आरोग्य केंद्राबाहेर पहाटे पाचपासूनच रांगा लागत आहे. यात १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या युवकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. आरोग्य केंद्रावर गेल्यावरच नाव नोंदणी केली जाईल, असे युवकांना वाटल्याने सोबत आधारकार्ड घेऊन बहुतांश युवक लसीकरणासाठी केंद्रावर आले मात्र ऑनलाइन नोंदणी असलेल्या युवकांनाच लसीकरण केले जाणार असल्याचे कळताच ते माघारी हताशपणे परतले. महात्मा फुले आरोग्य केंद्रावर कोविडचा पहिला डोस मिळाला असलातरी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न आल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला.

वाद वाढल्याने पोलिस बंदोबस्त तैनात

जिल्हा प्रशासनाकडून कोवीशिल्डचे तीन हजार १०० डोस मिळाले. यात पालिका दवाखाना २ हजार ४००, रेल्वे हॉस्पिटल ५०० तर आयुध निर्माणी रुग्णालयात २०० लस मिळाल्या आहेत. नगरपालिका दवाखान्यात लसीकरणासाठी नागरीकांची अलोट गर्दी होऊन, गोंधळ उडाला. यानंतर लागलीच पोलिसांना पाचारण करण्यात येऊन पोलिस व होमगार्ड यांचा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक बाबासाहेबे ठोंबे यांनी पालिका दवाखान्यात जात गर्दीला समजावत शांततेचे आवाहन केले.

पहिल्या टप्प्यात ३० टक्के लसीकरण

शहरातील विविध केंद्रावर पहिला डोस घेणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनचे ४०० डोस आले. पहिल्या टप्प्यातील ३० टक्के तर दुसऱ्या डोसचे ७० टक्के लसीकरण करण्यात आले. १५ ते ४४ वयोगटातील ऑनलाइन नाव नोंदणी केल्यानंतर ती यादी आरोग्य विभागाकडे येते व नंतर डोस दिला जातो. शहरातील खडका रोड आरोग्य केंद्र, यावल रोडवरील पालिका दवाखाना, वरणगाव रोडरवरील प्राथमिक आरोग्य केंद्र, शिवदत्त नगर येथे पहिल्या डोसाचे लसीकरण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com