भुसावळ, जळगावात ७० हजारांचा गुटखा जप्त 

चेतन चौधरी
Friday, 25 December 2020

पोलिस कोठडीदरम्यान विचारपूस केली असता, त्याने गुटखा माल जळगाव येथून आणल्याचे सांगितले. त्यामुळे शुक्रवारी (ता. २५) जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील जे. बी. ट्रेडर्स नावाचे दुकान गुन्ह्यातील आरोपीने दाखविले.

भुसावळ (जळगाव) : शहरातील डायमंड कॉलनी परिसरात गुटखा विक्रेत्यास अटक करण्यात आली असून, त्याच्या माहितीवरून जळगावातील सिंधी कॉलनीत पोलिसांनी कारवाई करीत ७२ हजार १८७ रुपयांचा गुटखा भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने जप्त केला. 
भुसावळ शहरातील डायमंड कॉलनी असलेला गुटखा विक्रेत्यावर बुधवारी (ता. २३) रात्री तीनला गुन्हा दाखल आहे. संशयित आरोपी, यासीन ऊर्फ आज्जु अन्वर शेख (रा. आवेश पार्क डायमंड कॉलनी, भुसावळ) याला गुटखा विक्री करताना अटक करण्यात आली होती. यास पोलिस कोठडीदरम्यान विचारपूस केली असता, त्याने गुटखा माल जळगाव येथून आणल्याचे सांगितले. त्यामुळे शुक्रवारी (ता. २५) जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागातील जे. बी. ट्रेडर्स नावाचे दुकान गुन्ह्यातील आरोपीने दाखविले. या दुकानातून गुटखा विक्री करणारा मुख्य व्यापारी आरोपी गिरीश खानचंदानी (वय ४०, रा. डी.मार्टजवळ, आदर्शनगर, जळगाव) तसेच जयेंद्र स्वामी (२६, रा. आदर्शनगर, जळगाव), शेख शकील शेख मासूम (४१, रा. खंडेरावनगर, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोटला, पोलिस शिपाई विकास सातदिवे, रवींद्र तायडे, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, ईश्वर भालेराव, सुभाष साबळे, प्रशांत सोनार, हवालदार चालक अय्याज सय्यद यांनी केली असून, जळगाव शहरातील आंनदसिंह पाटील, योगेश साबळे यांनी कारवाई केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal crime news police action tobaco seal