भुसावळात पहिले धर्मार्थ कोविड सेंटर कार्यान्वित; १०० बेडची सुविधा

भुसावळात पहिले धर्मार्थ कोविड सेंटर कार्यान्वित; १०० बेडची सुविधा
covid center
covid centercovid center

भुसावळ (जळगाव) :जय गणेश फाऊंडेशन व रोटरी रॉयल्स क्बलच्या माध्यमातून म्युनिसीपल हायस्कूलमध्ये कोविड केअर सेंटर (covid care center) सुरु करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केले. हे भुसावळातील (bhusawal) पहिले धर्मार्थ कोविड केअर सेंटर आहे. १०० बेड उपलब्ध असून रुग्णांना विलगीकरणाची सुविधा दिली जाणार आहे. (bhusawal first dharmarth covid center start)

covid center
नंदुरबार जिल्‍ह्‍याची पिछाडी; लसीकरणात शेवटून तिसऱ्या स्थानी

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्याहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा, जय गणेश फाऊंडेशनचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, पैशांअभावी गोरगरीबांना उपचार मिळत नसतांना जय गणेश कोविड सेंटरची उभारणी हा अभिमानास्पद उपक्रम असून मानवसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी येथे केले.

सर्वोतोपरी सहकार्य करणार

मुख्याधिकारी संदीप चिद्रावर यांनी संस्थेचे कौतुक करून समाजाला गरज असतांना कोविड सेंटरची उभारणी झाल्याचे सांगून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

covid center
धावती कार विहिरीत; अपघाताने परिवारच गेला, चौघांचा मृत्‍यू चालक सुखरूप

समाजाने पुढे येण्याची गरज

माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी गोरगरीब जनतेला सेवा देण्यासाठी समाजाने पुढे येण्याचे सांगून होम क्वारंटाइर्नच्या नावाखाली शहरात फिरून कोरोना संक्रमण करण्यापेक्षा कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन कोरोना मुक्त होण्याची गरज असल्याचे सांगितले. जय गणेश कोविडसेंटरमध्ये डॉ.निखील पाटील हे वैद्यकीय सेवा देणार आहेत, त्यांना डॉ.अभय कोटेचा आणि पूर्वा नेमाडे हे साहाय्य करणार आहेत.

यशस्वीतेसाठी यांचे सहकार्य

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय गणेश फाऊंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे, विद्यमान अध्यक्ष धिरज धांडे, सचिव तुषार झांबरे, रोटरी रॉयल्सचे सचिव राजेंद्र यावलकर, स्पोर्ट्स क्लब कार्याध्यक्ष चैत्राम पवार, फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष प्रविण पाटील, स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष निलेश कोलते, नीळकंठ पाटील, अतुल भारंबे, अनुपसिंग ठाकूर, रवी पाटील, रोटेरीयन महेश फालक, शरद लोहार, शुभम नेमाडे, हर्षल वानखेडे, सुमित यावलकर, विशाल आहुजा, रो.विनोद तायडे, रो.धीरज मुळे, देवेंद्र राजपूत आदी पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com