आणखी होणार किसान एक्सप्रेससह पार्सल गाड्यांचा विस्तार 

चेतन चौधरी
Friday, 1 January 2021

अप- डाऊन देवळाली मुजफ्फरपूर- देवळाली किसान पार्सल गाडी 31 मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही गाडी नाशिक, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खंडवा या स्थानकावर थांबेल.

भुसावळ (जळगाव) : शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून वाढता प्रतिसाद लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनकडून किसान एक्सप्रेस आणि पार्सल गाडीचा विस्तार करण्यात आला आहे.

देवळाली मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडी 
गाडी क्रमांक 00107/00108 अप- डाऊन देवळाली मुजफ्फरपूर- देवळाली किसान पार्सल गाडी 31 मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही गाडी नाशिक, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खंडवा या स्थानकावर थांबेल. सांगोला- मनमाड किसान लिंक पार्सल गाडी क्रमांक 00107/00108 अप- डाऊन सांगोला- मनमाड- सांगोला किसान लिंक पार्सल गाडी आणि सांगोला शालिमार किसान पार्सल गाडी क्रमांक 00123/00124 अप डाऊन सांगोला- शालिमार -सांगोला किसान लिंक पार्सल गाडी, गाडी क्रमांक 00113/00114 अप डाऊन मुंबई- शालिमार- मुंबई पार्सल गाडी हि 31 मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. मुंबई- शालिमार- मुंबई पार्सल गाडी ही नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा या स्थानकावर थांबेल. गाडी क्रमांक 00913/00914 अप डाऊन पोरबंदर -शालिमार- पोरबंदर पार्सल गाडी हि 1 एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही गाडी -भुसावळ, अकोला, बडनेरा येथे थांबेल. किसान एक्सप्रेस आणि पार्सल गाड्यांची मुदतवाढ करण्यात आल्यामुळे याचा फायदा शेतकरी, कार्गो एग्री ग्रेटर, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांना होणार आहे.  

भुसावल रेल्वे विभागातील इतके कर्मचारी सेवानिवृत्त
रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावल रेल्वे विभागातुन 37 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मच्यार्याना रेल्वेतर्फे तत्काल 12 कोटी 95 लाख रुपये त्यांच्या खत्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वेद्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाद्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन खंडवा, अकोला, भुसावल, पाचोरा, चालीसगाव, बड़नेरा, अमरावती इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal kisan and parcel railway extend