गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा अजब फंडा; प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर केले इतके

railway platform ticket
railway platform ticket

भुसावळ (जळगाव) : कोरोना महामारीमुळे देशभरात रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटांची सुविधा बंद करण्यात आली होती. आता ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरुन थेट ५० रुपये केले आहे. यासंदर्भात रेल्वेने नवी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीटही आता पाचपट महागल्याने नातेवाईक किंवा मित्र मंडळींना रेल्वे प्लॅटफॉर्मपर्यंत सोडण्यासाठी जाणाऱ्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. 

कोरोना महामारीमुळे यापूर्वी गेल्या वर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली होती. फक्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जात होता. आता बदललेल्या परिस्थितीमध्ये रेल्वेस्थानकावरील गर्दी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी रोखण्यासाठी भुसावळ विभागातील काही रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट दर पाच पट वाढवून दिले जाणार आहे. 

सर्वसामान्यांना फटका 
देशात पेट्रोल, डिझेल, रिक्षा भाववाढीनंतर आता रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांमध्येही दरवाढ आहे. वाढत्या कोरोनामुळे आधीच सामान्यांना फटका बसत असताना रेल्वेची वाढती दरवाढ सामान्यांना आर्थिक संकटात टाकणार आहे. मात्र, कोरोनाला टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. रेल्वे स्थानकांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशानसानाने ही प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी तब्बल ५० रुपये मोजावे लागणार आहेत. रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिट दरात पाचपट वाढ केली आहे. भुसावळ विभागातील रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी ही नवीन दरवाढ लागू असणार आहे. विशेषत: ज्या स्थानकांवरून बाहेरगावी जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आहे, अशा स्थानकांवर ही दरवाढ झाली आहे. 

या स्थानकांच्या आहे समावेश 
रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनुसार भुसावळ विभागातील नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा या स्थानकांवर ११ मार्च ते १० जूनपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर पाचपट वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता मध्यरेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी १० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. ज्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक गर्दी होते, अशा स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com