फाटाफूट तीच केवळ फासे पलटले..भाजपच्‍या नगरसेवकात जुने निष्‍ठावान नव्‍हतेच

jalgaon corporation
jalgaon corporation

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सोमवारी फुटले असले तरी पूर्वी भाजपला याच आयारामांमुळे सत्ता मिळाली होती. भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला. सुरेश जैन यांची एकहाती सत्ता असताना त्या वेळी भाजपने मोठा लढा दिला होता. सध्या सुरू असलेल्या फुटीच्या राजकारणामुळे फासे पलटले आहे. याच आयारामांमुळे आता महापालिकेत भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 
पालिका असताना थेट नगराध्यक्ष निवडणुकीत २००२ मध्ये भाजपला यश मिळाले होते. मात्र त्या वेळी नगरसेवकांचे बहुमत सुरेश जैन यांच्या गटालाच होते. त्या वेळी एकनाथ खडसे भाजपचे नेतृत्व करीत होते. याच काळात प्रथम जळगाव पालिकेत भाजपने जैन यांच्या गटाचे १५ नगरसेवक फोडले. पालिकेतील ही पहिली फूट. त्यानतंर फुटीचे राजकारण सुरू झाले. जैन यांच्या गटाने भाजपचे नगरसेवक फोडले होते. गिरीश महाजन यांनी खाविआ, राष्ट्रवादी फोडली. 

मूळ भाजपचे उमेदवारच होते कमी
महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना भाजपचे नेते गिरीश महाजन यांचाकडे पालकमंत्री पद होते. २०१८ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी तत्कालीन खानदेश विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे तब्बल ४५ नगरसेवक फोडले होते. त्यांनाच पुढे भाजपची उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत मूळ भाजपचे उमेदवार कमीच होते. याच बळावर भाजपने ५७ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. शिवसेनेचे १५ तर ‘एमआयएम’चे तीन नगरसेवक आहेत. 

नगरसेवकांची नाराजी भोवली 
निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले. भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली. महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यामुळे भाजप नेत्यांचे महापालिकेकडे दुर्लक्ष झाले. अडीच वर्षांत अनेक कारणांमुळे भाजप नगरसेवकांमध्ये असंतोष वाढत होता. आता महापौर व उपमहापौर निवडणुकीत हा असंतोष उफाळून आला आणि आयाराम नगरसेवक यांनी पुन्हा फुटीची वाट धरली. या नगरसेवकांना नेते गिरीश महाजन कसे पुन्हा पक्षाकडे आणणार, याकडेच आता लक्ष लागले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com