आयुष्‍यभराचा जोडीदार- चॅलेंज..जवान राहुल पाटील यांच्या निधनापुर्वी पत्‍नीची पोस्‍ट; हे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी

post viral social media
post viral social media

जळगाव : एरंडोल येथील बीएसएफचे जवान राहुल पाटील यांचे पंजाब येथे ड्युटीवर असताना हृदयविकाराने निधन झाले. हा आघात परिवारासाठी धक्‍कादायक ठरला. हा आघात परिवारासाठी मोठा तर होताच पण फेसबुकवरील राहुल पाटील यांच्या एका पोस्‍टने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. फेसबुकवरील ‘आयुष्‍यभराचा जोडीदार चॅलेंज’ करणाऱ्या ज्‍योती पाटील यांना नियतीने पतीला आयुष्‍यभरासाठी दूर केले.

एरंडोल येथील राहुल पाटील हे पंजाबमधील पाकिस्तान लगत असलेल्या फजिलंका बॉर्डरवर कार्यरत होते. तेथील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्‍यात त्‍यांचे निधन झाले. त्‍यांच्या निधनाची बातमी घरी समजताच साऱ्यांच्या अश्रुंचा बांध फुंटला. परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश आणि राहुल पाटील यांच्या दोन लहान चिमुकल्‍या मुलींकडे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. 

पत्‍नीच्या चॅलेंजची अधुरी कहाणी
जवान राहुल पाटील यांचे निधन होणे हे साऱ्यांसाठी दुःखदायी ठरले. पण ही घटना घडण्यापुर्वी आठ तासांपुर्वीच पत्नी ज्‍योती पाटील यांनी सकाळी फेसबुकवरील ‘आयुष्य भराचा जोडीदार- चॅलेंज’ याला टॅग करत पती राहुल पाटील यांच्यासोबतच फोटो टाकत पोस्‍ट शेअर केली होती. परंतु पंजाब येथे ड्युटीवर असतांना काळाने घात केला आणि जवान राहुल पाटील हे ज्‍योती पाटील यांच्या आयुष्‍यातून कायमचे दूर झाले अन्‌ पत्‍नीच्या चॅलेंजची कहाणी अपुर्णच राहिली; ही पोस्‍ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली.

व्हिडीओ कॉलवरून मुलीला शुभेच्छा
राहुल पाटील यांच्या मुलीचा वाढदिवस गुरूवारी (4 फेब्रुवारी) होता. मुलीला शुभेच्छा देण्यासाठी राहुल पाटील यांनी व्हिडिओ कॉल केला. यावेळी त्‍यांनी परिवारातील सर्वांशी गप्पा मारल्‍या होत्‍या. यानंतर अचानक राहुल पाटील यांच्या मृत्‍यू झाल्‍याचा फोन आल्‍याने संपुर्ण परिवाराला धक्‍काच बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com