
भर रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या विद्युत रोहित्राजवळ बराच वेळ झाला तरूण उभा होता. विद्युत पेटीमध्ये हात घालून हा नेमके करतो काय? हे अनेकांना उमगले नाही. बराच वेळ गोंधळ उडाला पण वाहतुक पोलिसांच्या सतर्कतेने त्याला बाजूला सारले. हा तरूण विद्युत रोहित्राजवळ उभा राहून नेमका करतो काय असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण त्या तरूणाच्या मनात वेगळेच होते.
जळगाव : बसस्थानकासमोरील विद्युत रोहित्रात हात घालून तरूण उभा होता. त्याचा इरादा आत्महत्या करण्याचा होता. बराच वेळ गोंधळ उडाल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने तरूणाचे प्राण वाचले.
शहरातील मुख्य बसस्थानक आणि जिल्हा पेठ पोलिस स्टेशन समोरासमोर आहे. येथून गेलेल्या रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर विद्युत रोहित्र आहे. या रोहित्राजवळ एक तरूण उभा होता. सायंकाळी अनेकांची घरी जाण्याची धावपळ होती. यामुळे तरूणाकडे दुर्लक्ष होते. पण येथे नेहमी वाहतुक पोलिस उभे राहतात. आज देखील होते; त्यांनी तरूणाला पाहिले आणि हटकले. त्याची विचारपुस केली असता तो आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचे समोर आहे.
अंगात थरकाप
विद्युत पुरवठा सुरू असताना सदर तरूण विद्युत पेटीमध्ये हात घालून उभा होता. त्याला हाय व्होल्टेजचा झटका लागला तर जागीच कोळसा होण्याची भीती होती. यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगात थरकाप उडाला होता.
तात्काळ विद्युत पुरवठा केला बंद
विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणाला हटकले. यामुळे त्याचे प्राण वाचू शकले. सदर तरूणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसांना आपली ओळख सांगितली. कैलास भांगे (वय ४०, रा. यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. तो तरूण बराच वेळ रोहित्राजवळ उभा असल्याचे लक्षात आल्यावर या चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याचा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. वीज पुरवठा थोडा वेळ खंडित करून पोलिसांनी त्याचा रोहित्रातील हात काढला. त्यानंतर वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आणि जिल्हा पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली.