मध्यरात्रीनंतर कारमधून आले; पण त्‍यांचा प्रयत्‍न फसला आणि ग्रामस्‍थांनी घडविली अद्दल

robbery
robbery

मेहुणबारे (जळगाव) : वरखेडे तांडा (ता.चाळीसगाव) येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीतील चौघांना ग्रामस्थांनी रात्री अडीचच्या सुमारास मोठ्या शिताफीने पकडले. अंधाराचा फायदा घेत टोळीतील दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. या चौघांकडे कारसह धारदार शस्रे मिळून आली असून तपासात त्यांच्याकडून दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वरखेडे तांडा (ता.चाळीसगाव) येथे आज मध्ययरात्री आडीचच्या सुमारास वरखेडे- लोंढे रसत्यावर असलेल्या बंद दुकान फोडून ऐवज लंपास करण्याच्या बेतात असलेल्या परजिल्यातील टोळीला ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडले. या टोळीतील सर्व सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दुकान फोडत असल्‍याचे लक्षात आले अन्‌
रात्री दुकान फोडत असल्याचे ईश्वर राठोड या मुलाच्या लक्षात आले. त्याने लगेच गावात दादा जाधव यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर सर्व ग्रामस्थ मोठ्या सावधगिरीने आले; परंतु त्यांना चाहुल लागताच ते गाडी सोडून शेतात पळुन गेले. मात्र ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेत चौघांना पकडून आणले. यानंतर त्यांच्या गाडीत काही हत्यार व साहित्य मिळुन आले. या घटनेची माहिती वरखेडे येथील पोलीस पाटील राधेश्याम जगताप यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या चोरांना कुठल्याही प्रकारची मारझोड करु दिली नाही. यानंतर मेहुणबारे पोलिसांनी तातडीने वरखेडे तांडा येथे जावुन कमलेश राजपुत यांनी ताब्यात घेतले. या सर्वांची पोलिसांकडून कसुन चौकशी सुरु असुन दरोडे सारखे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com