मुलाच्या मृत्यूनंतर तासाभरातच आईनेही सोडले प्राण 

dead
dead

कासोदा (जळगाव) : आईला मुलाबद्दल असलेला स्नेह, आईचे वात्सल्य काय असते, याची प्रचीती कासोदावासीयांना शनिवारी (ता. १३) एका दुर्दैवी घटनेवरून अनुभवयास मिळाली. येथे मुलाच्या मृत्यूची वार्ता कानावर पडताच जन्मदातीने प्राण सोडण्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
एरंडोल तालुक्‍यातील कासोदा येथील माजी उपसरपंच तथा भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष जलालोद्दिन सलाउद्दिन (वय ६०) यांचे शनिवारी (ता. १३) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. जलालोद्दिन सलाउद्दिन यांच्या निधनाची बातमी त्यांची आई जमशादबी सलाउद्दिन (वय ८५) यांना कळताच त्यांना पुत्रविरह सहन न झाल्याने जमशादबी यांनी एका तासातच म्हणजेच सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास जगाचा अखेरचा निरोप घेतला. एकाच दिवशी माता-पुत्राचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

एकाच वेळी निघाली अंत्‍ययात्रा
जलालोद्दिन सलाउद्दिन व त्यांची माता जमशादबी सलाउद्दिन या दोघांचीही अंत्ययात्रा एकाच वेळेस रात्री अकराला घरापासून काढण्यात आली होती. दोन्ही माता-पुत्रांवर मुस्लिम कब्रस्थानात एकाच वेळी दफनविधी करण्यात आला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com