esakal | रुग्णांसाठी सावद्यातून मदतीचा ‘बूस्टर डोस’

बोलून बातमी शोधा

help
रुग्णांसाठी सावद्यातून मदतीचा ‘बूस्टर डोस’
sakal_logo
By
टिम इ सकाळ

सावदा (जळगाव) : येथे कोविड सेंटरमधील ऑक्सिजन बेडसाठी दात्यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, शास्त्री भक्तिकिशोर दास, प्रांताधिकारी कैलास कडलक, मुख्याधिकारी सौरभ जोशी आदींनी केले होते. त्याला प्रतिसाद देत सावद्यातून पावणे दोन लाखांची आर्थिक मदत गोळा झाली आहे.

फैजपूर येथील जे. टी. महाजन कॉलेज सातपुडा वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यासाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, यासाठी एक बैठक पार पडली होती. त्यात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सावदा फैजपूर परिसरातून पावणे दोन लाखांची मदत करण्यात आली आहे. फैजपूरचे प्रांत कैलास कडलग, मुख्याधिकारी सौरभ जोशी, उद्योजक जे. के. टेकवानी, दत्त इरिगेशनचे युंगधर पवार, नगरसेवक अल्लाबक्ष, सावदा सहकारी दूध डेअरी सचिव देवेंद्र बोंडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र पाटील, डॉ. शंतनू सरोदे, जयस्वाल, डॉ. चंद्रशेखर पाटील, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन सावदा गोल्डन, जनता ट्रान्स्पोर्ट, गोपाल अग्रवाल, प्रिन्स रोडलाईन्स, न्यू गोल्डन ट्रान्स्पोर्ट, नरेश सेठ, बाजार समिती संचालक पंकज येवले आदींनी आर्थिक मदत केली आहे.

प्रशासनाने मानले आभार

कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांचे उपचार व सेवा आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील हे पाहत आहेत, तर आरोग्य विभागाचे कर्मचारी व पालिका कर्मचारी सहकार्य करीत आहेत. दानशूर व्यक्तींचे संत मंडळी व प्रशासनाने आभार मानले आहेत.