esakal | कोरोना ‘टीका महोत्सवा’चा जळगावात फज्जा; लसीकरण केंद्र बंदच
sakal

बोलून बातमी शोधा

corona tika mahotsav

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. चार दिवसांपासून कोव्हिशील्ड लस उपलब्ध नाही. गेल्या आठवडयात चार दिवस केंद्रे बंद होती. अद्यापही ती बंदच आहेत. जिल्ह्यात लसच नसतील तर आरेाग्य विभाग टीका महोत्सव कसा साजरा करणार.

कोरोना ‘टीका महोत्सवा’चा जळगावात फज्जा; लसीकरण केंद्र बंदच

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ते १४ एप्रिलपर्यंत टीका महोत्सवाची (लसीकरण)घोषणा केली आहे. मात्र जळगाव जिल्हयात लसच नसल्याने पहिल्याच दिवशी या महोत्सवाचा फज्जा उडाल्यागत आहे. शहरात आजही सर्वच लसीकरण केंद्रे बंद होती. यामुळे नागरिकांना लसींसाठी भटकंती करावी लागली. मात्र लसी नसल्याने केंद्रे बंद असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. चार दिवसांपासून कोव्हिशील्ड लस उपलब्ध नाही. गेल्या आठवडयात चार दिवस केंद्रे बंद होती. अद्यापही ती बंदच आहेत. जिल्ह्यात लसच नसतील तर आरेाग्य विभाग टीका महोत्सव कसा साजरा करणार. लसी उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण महोत्सव घेवू अशी भुमिका आरोग्य विभागाची आहे. जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असताना लसीकरण महत्वाचे आहे. १८ वषावरील सर्वानाच लसीकरण करणे गरजेचे असताना लसींचा तुटवडा भासत असल्याने आरोग्य विभागही हतबल झाला आहे. 

लस प्राप्त पण दुसऱ्या डोससाठीच
जिल्ह्यात कोव्हिशील्ड लसींचे दोन लाख चार हजार ३४० डोस आले होते. त्यातील एक लाख ९५ हजार ५४० डोस वापरले गेले. आठ हजार ८०० डोस दोन दिवसांत ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर पाठविण्यात आले, तर को-व्हॅक्सिन लसींचे १८ हजार डोस आले आहेत; तेही वापरले गेले. आता तीन हजार ६८० को- व्हॅक्सिन लसींचे डोस आले आहेत. ज्यांनी को-व्हॅक्सिन लस अगोदर घेतली आहे, त्यांनाच ते दिले जात आहेत. कोव्हिशील्ड लसीचे डोस संपल्यात आहेत. 

केंद्रावर भटकंती 
शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजीनगर रुग्णालय व खासगी ठिकाणी सुरू असलेले लसीकरण केंद्रावर आज अनेकांनी भेट देवून सुटीचा दिवस आहे. गर्दी कमी असेल लस लगेच मिळेल या आशेने भेट दिली. मात्र त्यांची घोर निराशा झाली आहे. 
 
जिल्ह्यात उद्या (ता.१२)सकाळी ३५ हजार ७५५ कोव्हिशील्ड लसी उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच कालावधीत मागणीनूसार लसी उपलब्ध होतील. यामुळे तोच लसीकरण महोत्सव. 
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक 

संपादन- राजेश सोनवणे

loading image