पालकांनो सावधान..मुलांना कोरोनानंतर ‘एमआयएससी’चा धोका

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा सध्या उद्‌भवलेली दुसरी लाट अधिक तीव्र व हानिकारक असल्याचे आकडे रोज समोर येत आहेत.
child coronavirus
child coronaviruschild coronavirus

जळगाव : कोरोना होऊन गेल्यानंतर मुलांमध्ये ‘एमआयएससी’ची लक्षणे जाणवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचे वेळीच निदान व योग्य उपचार केले, तर त्यातून निर्माण होणारा धोका टाळला जाऊ शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा सध्या उद्‌भवलेली दुसरी लाट अधिक तीव्र व हानिकारक असल्याचे आकडे रोज समोर येत आहेत. पहिल्या लाटेत कोरोनापासून अल्पवयीन मुलांसह तरुणांना तुलनेने कमी धोका होता. मात्र, या दुसऱ्या लाटेत कोरोनाने मुलांसह तरुणांनाही विळख्यात घेतले आहे.

कोरोनानंतरची स्थिती

बहुतेकदा पंधरा वर्षांखालील मुलांमध्ये कोरोना आजाराची लक्षणे सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची असतात तरी कोरोना बरा होऊन गेल्यावर गंभीर स्वरूपाचे आजार त्यातून उद्‌भवू शकतात.

‘एमआयएससी’चा धोका

कोरोना संसर्ग होऊन गेल्यावर शरीरात ज्या अँटिबॉडीज तयार होतात त्यातूनही मुलांना काही गंभीर आजार होऊ शकतात. त्याला सायटोकॉइन स्टोर्म किंवा मल्टिसिस्टिम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम (एमआयएससी) असे म्हणतात. म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते; पण तीच रोगप्रतिकारशक्ती शरीराच्या विरोधात काम करते. साधारणतः १५ वर्षांखालील मुलांमध्ये अशा तक्रारी आढळतात.

अशी आहेत लक्षणे

डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे, अंगावर सूज येणे, तीव्र ताप, डोकेदुखी, जुलाब, उलट्या, पोटात दुखणे, औषध देऊनही ताप उतरत नाही, रक्तदाब कमी होतो, हातपाय थंड पडणे.

आजाराचा प्रवास

आजार लवकर लक्षात आला तर त्याचा उपचार सोपा आहे. रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. क्वचित प्रसंगी आयसीयूची गरज पडू शकते. या आजारात रुग्णाची प्रकृती झपाट्याने खालावते. यात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी हृदय आकुंचन पावण्याची क्षमता मंदावणे, किडनी स्ट्रोक यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.

कोरोना होऊन गेल्यानंतर मुलांमध्ये अशाप्रकारचा आजार दिसून येतो. वेळीच निदान व उपचार केले, तर त्यातून रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

- डॉ. अविनाश भोसले, बालरोगतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com