यमाची वक्रदृष्‍टी..महिनाभरात शिक्षण विभागातील ३७ जणांचा मृत्‍यू

corona dead
corona dead

अमळनेर (जळगाव) : कोरोना महामारीने प्रचंड थैमान घातले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कोरोनासह इतर आजारांनी शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या चक्रव्यूहात अडकवले आहे. महिनाभरात कोरानासह इतर आजाराने तालुक्यातील ३७ जणांचा बळी गेला आहे. यात एक अधिकारी, १६ कार्यरत शिक्षक, सहा शिक्षकेतर कर्मचारी, तर १४ निवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 
वर्षभरापासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परिणामी, विविध कारणांमुळे शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना बाहेर पडावे लागले. पर्यायाने त्यांचे आरोग्य धोक्यात आले. या काळात शिक्षक विभागावर जणूकाही संक्रांत कोसळली आहे. यात पातोंडा येथील शिक्षक बंधूंवर बारा तासांतच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. बोळे तांडा आश्रमशाळेतील दोन शिक्षक मित्रांचा तेरा दिवसांत, तर इंदिरा गांधी विद्यामंदिर या शाळेतील दोन शिक्षकांचा आठ दिवसांत मृत्यू झाला. वावडे येथील शिक्षकाच्या निवृत्त शिक्षक वडिलांसह आईवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. एका निवृत्त प्राध्यापक व त्यांच्या पत्नीचे चार दिवसांच्या अंतराने निधन झाले. नांद्री (ता. अमळनेर) येथील एकाच कुटुंबातील तीन निवृत्त शिक्षकांचा मृत्यू झाला. यात दोन सख्ख्या निवृत्त भावासह एका शिक्षिकेचा समावेश आहे. अनेक तरुण शिक्षकांवर क्रूर काळाने झडप घातली आहे. ‘अर्ध्यावरती डाव मोडीला, अधुरी एक कहाणी’मुळे हे मृत्यू मन हेलावून टाकणारे आहे. 

कार्यरत शिक्षक, अधिकारी 
शिक्षण विस्ताराधिकारी बी. पी. चौधरी (वय ४५), सावखेडा हायस्कूलचे जयराम गावित (४४), चौबारी विद्यालयाचे के. एन. पाटील, बोळे तांडा आश्रमशाळेचे विशाल संदानशिव (३८), आर. एल. कॉलेजचे प्रा. डॉ. प्रवीण येवले (५५), अंतुर्ली आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजय चंदनखेडे, पातोंडा हायस्कूलचे जगदीश पवार, इंदिरा गांधी शाळेचे दिलीप चव्हाण (४५), लोंढवे जिल्हा परिषद शाळेचे जितेंद्र बिऱ्हाडे, प्रताप महाविद्यालयचे प्रा. विशाल पाडवी (३८), शिरुड (ता अमळनेर) येथील शाळेचे लक्ष्मण पाटील, जानवे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक पी. आर. पाटील, बोळे तांडा आश्रमशाळेचे हेमकांत पाटील (३८), इंदिरा गांधी शाळेचे बाळासाहेब देशमुख (५३), आर्मी स्कूलचे आर. पी. पावरा (३५), साने गुरुजी विद्यामंदिर शाळेचे दीपक चौधरी (४८) या शिक्षकांचा मृतांत समावेश आहे. 

शिक्षकेतर कर्मचारी 
रुक्मिणीताई महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक व्ही. जे. इंगळे (५८), नवलभाऊ कृषी महाविद्यालयाचे ग्रंथपाल राजेश साळुंखे (५०, मारवड) अध्यापक विद्यालयाचे कर्मचारी प्रदीप पाटील (४८, सोनखेडी), मुडी संस्थेचे कर्मचारी एकनाथ लांडगे (५१, अंबापिंप्री), डांगरचे लिपिक अशोक पाटील, कुर्ऱ्हे विद्यालयाचे रवींद्र चौधरी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

निवृत्त शिक्षक व कर्मचारी 
निवृत्त शिक्षक विठ्ठल चौधरी (६७, नांद्री), प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त ग्रंथपाल श्‍यामदास छाजेड (६४), सावखेडा हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक जी. ए. बैसाणे, शिरूड हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक बी. व्ही. चव्हाण (६५), मारवड हायस्कूलचे निवृत्त माध्यमिक शिक्षक राजेंद्र साळुंखे, पालिकेचे निवृत्त मुख्याध्यापक सुकदेवराव देशमुख (९५), निवृत्त उपप्राचार्य प्रा. नंदलाल पवार (६२, पातोंडा), वावडे केंद्रातील निवृत्त मुख्याध्यापक जीवन भिल, निवृत्त शिक्षक दिनकर चौधरी (६३, नांद्री), धनाजी महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. शशिकांत काळकर (६७), निवृत्त शिक्षिका मीराबाई चौधरी (७६, नांद्री), निवृत्त मुख्याध्यापक हिरालाल भावसार (६६), निवृत्त शिक्षक पुंडलिक मोरे (७३, पैलाड), निवृत्त केंद्रप्रमुख पितांबर बोरसे (७८, खौशी). 

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com