जनता कर्फ्यूला साद; कडकडीत बंदने रस्‍ते सामसूम

jalgaon janta curfew
jalgaon janta curfew

जळगाव : शहरात लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूचा काहीअंशी पहिल्या दिवशी फज्जा उडाल्यानंतर दुसरा आणि तिसरा दिवस मात्र कडकडीत बंद राहिला. नागरिकांनी स्वतःहून प्रतिसाद देत घरात बसणे पसंत केल्याने दिवसभर रस्ते ओस पडलेले दिसून आले. शिवाय, आजचा रविवार असल्‍याने घराबाहेर निघणेच अनेकांनी टाळले.

सर्वच व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला पहिल्या दिवसापासून कडकडीत बंद पाळत प्रतिसाद दिला. मात्र, तरीदेखील शुक्रवारी (ता. १२) नागरिक गावात येऊन उगाच भटकत होते. परंतु, शनिवार आणि रविवार कार्यालय देखील बंद असल्‍याने कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांची रहदारी देखील आज पाहण्यास मिळाली नाही. अर्थात जळगावकरांनी जनता कर्फ्यू पाळण्यास चांगल्‍या प्रकारे प्रतिसाद दिल्‍याचे जाणवत आहे. 

गजबजणारा परिसर ओस
सकाळपासूनच रस्त्यावर गर्दी नव्हती. दुपारी कडक उन्हामुळे रस्ते ओस पडलेले दिसून आले. दुपारी अकरानंतर आकाशवाणीसह विविध चौकांत पोलिस दिसून आले. त्यांनी काही वाहने अडवीत चौकशी केली. चित्रा टॉकीज चौक, राजकमल चौक, नेरी नाका, कालिंकामाता चौक, अजिंठा चौफुली, पांडे चौक, इच्छादेवी चौफुली, गणेश कॉलनी, शिव कॉलनी आदी परिसरात पोलिसांनी गस्त घातली. सेंट्रल फुले मार्केट, गांधी मार्केट, दाणा बाजार, चित्रा चौक परिसरातील दुकाने, गोलाणी मार्केट, भास्कर मार्केट, आंबडेकर मार्केट, रेल्वेस्थानकाकडील मार्केट आदी व्यापारी संकुलांत शुकशुकाट होता. बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली असून, अनेकांचा रोजगारही बुडाला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com