पंधरा हजार कोरोनाबाधितांसाठी बेड तयार; आरोग्य यंत्रणा कामाला

covid center
covid center

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण दररोज वाढताहेत. रोज पंधराशेच्यावर कोरोना चाचण्या होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पैकी, २० ते ३० टक्के कोनोनाबाधित येत आहेत. यामुळे कोरोनोची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेने विविध ठिकाणी तब्बल १५ हजार कोरोना रुग्णांसाठी बेड तयार केले आहेत. 
ज्या परिसरातील रुग्ण पॉझिटिव्ह येतो त्याच्या संपर्कातील २० जणांची यादी तयार केली जाते. त्यांचे स्वॅब घेऊन त्यांचेही स्वॅब घेतले जातात. त्यांचे कोरोना अहवालावरून पुढील संपर्कातील व्यक्तीची तपासणी होते आहे. ज्यांना फारशी लक्षणे नसतात त्यांना औषधोपचार करून घरी आयसोलेट केले जाते. जे रुग्ण गंभीर असतात त्यांना रुग्णालयात दाखल करून उपचार केला जातो. कोरोना रुग्ण लवकर आढळून येत असल्याने त्याचे निदान लवकर होत आहे. 

खासगी डॉक्‍टरांनी मागितली सेंटरची परवानगी
गतवर्षी कोरोनाचे रुग्ण लवकर सापडत नव्हते किंवा ते उशिराने दाखल होत होते. यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास उशीर होत असल्याने दगावण्याचे प्रमाण अधिक होते. सध्या सर्वच आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे. रुग्ण लवकर दाखल झाले तर उपचार लवकर सुरू होतील. कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरात पाच खासगी डॉक्टरांनी खासगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यास परवानगी मागितली आहे. 
 
कोरोना रुग्णांसाठी तब्बल पंधरा हजार बेड आज तयार आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे. रुग्ण लवकर आले तर उपचार लवकर होतील. नागरिकांनी मास्क वापरला, नियमांचे पालन केले तर कोरोनापासून दूर राहता येईल. 

-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 
 
दाखल रुग्णसंख्या 
आजची रुग्णसंख्या- १००० 
होम आयसोलेशन-- ७५० 
खासगी रुग्णालयात-- २२५ 
शासकीय रुग्णालयात-- ३६ 
इकरा रुग्णालयात--५० 
 
आकडे बोलतात.. 
आतापर्यंत 
एकूण बरे झालेले ५६ हजार ९८ 
एकूण पॉझिटिव्ह--५८ हजार ५३५ 
एकूण मृत्यू--१ हजार ३७१ 
 
तयार असलेले बेड-१५ हजार 
ऑक्सिजनयुक्त बेड--२ हजार 
व्हेंटिलेटर असलेले बेड--३४० 
प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर आहे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com