
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. मात्र, दररोज नव्याने आढळून येणारे रुग्ण कमी व्हायला तयार नाही. जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त हजार चाचण्यांच्या अहवालात नवे ३२ रुग्ण आढळून आले.
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात येत असला तरी मृत्युचे सत्र सुरुच आहे. मंगळवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ३२ नवे बाधित आढळून आले तर ३४ रुग्ण बरे झाले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात येत आहे. मात्र, दररोज नव्याने आढळून येणारे रुग्ण कमी व्हायला तयार नाही. जिल्ह्यात मंगळवारी प्राप्त हजार चाचण्यांच्या अहवालात नवे ३२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५६ हजार ६९१ झाली आहे. तर ३४ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ८४६ झाला आहे. मंगळवारी जळगाव शहरातील ६० वर्षीय पुरुष व धरणगाव तालुक्यातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या १३४७ झाली आहे.
जळगावात रुग्ण वाढतेच
जळगाव शहरात रुग्णसंख्या वाढतच आहे. मंगळवारीही नवे १० रुग्ण आढळून आले. भुसावळला ५, पाचोरा ३, रावेर व यावल तालुक्यात प्रत्येकी २, चाळीसगाव व बोदवड तालुक्यात प्रत्येकी ४, अमळनेर, भडगाव व अमळनेर तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला.