बरे होणाऱ्यांपेक्षा वाढले नवीन बाधित रुग्ण 

राजेश सोनवणे
Thursday, 17 December 2020

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त दिसून येत होती. सप्टेंबरच्या १७ तारखेपासून काही अपवाद वगळता हेच चित्र दररोज होते.

जळगाव : जिल्ह्यात आज अनेक दिवसांनंतर पुन्हा नव्या बाधित रुग्णांची संख्या बरे होणाऱ्यांपेक्षा जास्त नोंदली गेली. दिवसभरात ४८ नवे रुग्ण आढळले, तर ३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दरम्यान, जळगाव शहरात आजही २० नवीन बाधित आढळून आले असून शहरातील संसर्ग वाढतच आहे. 
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त दिसून येत होती. सप्टेंबरच्या १७ तारखेपासून काही अपवाद वगळता हेच चित्र दररोज होते. परंतु, आज पुन्हा बरे होणाऱ्यांचा आकडा ३३ नोंदला गेला, त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या ५३ हजार ५६६ झाली. तर नव्या ४८ बाधितांमुळे एकूण रुग्णसंख्या ५५ हजार २५३वर पोचली. गेल्या २४ तासांत भुसावळ तालुक्यातील एका ७६ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. 

जळगावात संसर्ग वाढताच 
गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातही सातत्याने रुग्ण वाढतच आहेत. बुधवारी २८ रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा २० नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील ॲक्टिव रुग्णांची संख्या १८४वर पोचली आहे. जळगाव ग्रामीणला ३, अमळनेरला ७, भुसावळ तालुक्यात ४, धरणगाव २, जामनेर ५, बोदवड व पारोळा तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण सापडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus update new patient

Tags
टॉपिकस
Topic Tags: