पहिले नकार नंतर होकार?; जिल्हा रुग्णालयात २३ ज्येष्ठांना लसीकरण 

corona vaccination
corona vaccination

जळगाव : जिल्हा रुग्णालयात सोमवारी (ता. १) ६० वर्षावरील २३ ज्येष्ठांना कोरोना लसीकरण मोफत करण्यात आले आहे. त्यात पंधरा पुरूष तर ८ महिलांचा समावेश होता. 
केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे सोमवारी खासगी रुग्णालये व शासकीय रुग्णालयांत ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाची मोहीम सूरू होणार होती. मात्र आज सकाळी महापालिकेच्या रुग्णालयात विचारणा केली असता ज्येष्ठांच्या लसीकरणाच्या ॲपमध्ये अपडेट करणे सूरू असल्याने लसीकरण न करण्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.तासखेडकर यांनी ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत सूचना नसल्याने लसीकरण सुरू झाले नाही. खासगी रुग्णालयात लसीकरणाचा ड्राय रन झाला नाही. असे सांगीतले होते. यामुळे ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र दूपारनंतर काही ज्येष्ठ जिल्हा रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावर लसीकरणासाठी गेले असता त्यांची नोंदणी होवून त्यांना लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले. सकाळी लसीकरणास नकार दिला नंतर दूपारी होकार दिला, अशा या अजब कारभाराबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

ज्येष्ठांचे हाल... 
जे ज्येष्ठ जिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी आले होते. त्यांना काठी टेकत, याचा त्याचा सहारा घेत तिसऱ्या मजल्या असलेल्या कोरोना लसीकरण केंद्रापर्यंत पोचताना दमछाक झाली. उद्यापासून (ता.२) जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांची लसीकरणास गर्दी होईल. यामुळे किमान आतातरी हे लसीकरण केंद्र तळमजल्यावर आणण्याची मागणी ज्येष्ठांची आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com