तयारी खरिपाची..२५ मेनंतर बी.टी. बियाणे मिळणार

तयारी खरिपाची..२५ मेनंतर बी.टी. बियाणे मिळणार
cotton seeds
cotton seedscotton seeds

जळगाव : जिल्ह्यात गत वर्षी चांगला पाऊस (Mansoon rain) झाला. यंदाही चांगल्या पावसाचे संकेत आहेत. यामुळे खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी (Farmer) सुरू केली आहे. कपाशीची लागवड यंदाही जास्त होणार असून, साडेपाच लाखांपेक्षा अधिक हेक्टवर कपाशीची (Cottone seeds) पेरणी होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे. कपाशीबरोबरच सोयाबीनचा पेरा ३० हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २५ मेनंतर बी. टी. बियाणे विक्रीस उपलब्ध होणार आहेत. (cotton seeds farmer available may last week)

cotton seeds
जागतिक परिचारिका दिन : ..अन्‌ त्‍यांच्या शुश्रूषेमुळे फुलते चेहऱ्यावर हास्य

मे महिना निम्मा उलटला आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. ४२ अशांपर्यंत तापमानाने उच्चांक गाठला आहे. असे असले तरी शेतकरीराजा एकीकडे उन्हाचा सामना करीत खरिपाची तयारी करण्यात गुंतला आहे. सकाळी लवकर शेतात जाऊन शेतातील नांगरणी करून धस, काडी-कचरा जमा करणे, शेताच्या बांधावर जमा झालेले गवत जाळणे, शेत पेरण्यांसाठी तयार करण्याची कामे सुरू आहेत.

कर्जाची प्रतीक्षा

खरिपासाठी लागणारे बियाणे, खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्जावर अवलंबून असतो. यंदा कोरोनाचे सावट आहे. जिल्हा बँक, पीक सोसायट्या, खासगी बँकांकडून आपल्या पदरात कर्जाने पैसे कसे मिळतील, या चिंतेत सध्या शेतकरी आहे. पीककर्जासाठी लागणारे विविध प्रकारची कागदपत्रं जमा करण्याचेही काम सुरू आहे. केव्हा एकदाचे कर्ज मिळते व खरिपासाठी बियाणे, खतांची खरेदी होतेय याची वाट शेतकरी पाहात आहे.

cotton seeds
अक्षयतृतीयेला बालविवाह होण्याचे संकेत?

२६ लाख पाकिटांची मागणी

यंदा जिल्ह्यात कपाशीचा अधिक पेरा होणार असल्याने २६ लाख ५२ हजार बी.टी. बियाण्यांच्या पाकिटांची मागणी शासनाकडे केली आहे. हे बियाणे १५ मेपर्यंत विक्रेत्यांकडे उपलब्ध होतील. नंतर मुख्य विक्रेते ते बियाणे विक्रेत्यांपर्यंत २५ पर्यंत पोचतील. त्यानंतर त्याची विक्री होणार आहे. कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी १ जूननंतर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार

शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना’ या शीर्षकांतर्गत विविध कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेंतर्गत लाभार्थींनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची आहे. एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी १५ मेपर्यंत शेतकऱ्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा, शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्राच्या माध्यमातून या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधारक्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com