सहाय्यक फौजदारास लाच घेताना अटक 

bribe
bribe

पारोळा (जळगाव) : येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जगदीश पवार यांना शनिवारी (ता. २०) वाहनावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडून ३०० रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. 
या वेळी नाशिक येथील पथकाने दिलेल्या माहितीनुसार अमळनेर येथील तक्रारदार हे त्यांच्याकडील वाहनाने पारोळा ते अमळनेर अशी प्रवासी वाहतूक करतात. त्या वाहनावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे शनिवारी लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम पोलिस ठाण्यासमोरील आवारात सार्वजनिक जागी स्वीकारण्याची खात्री झाल्यावर नाशिक येथील लाचलुचपत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, सहाय्यक पोलिस अधिकारी किरण रासकर, पोलिस कर्मचारी प्रकाश महाजन, गरुड, चालक गांगुर्डे यांच्या पथकाने सापळा रचून पवार यांना पकडले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com