आई लग्‍नाला अन्‌ वडील शेतात; घरात ती एकटीच आणि केले भलतेच

रईस शेख
Thursday, 7 January 2021

घरात कोणीही नसताना गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली. आई गावातील एका लग्नसमारंभात गेली होती, तर वडील शेतात गेले होते.

जळगाव : भादली (ता. जळगाव) येथील २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तालुका पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 
जळगाव तालुक्यातील भादली येथील खुशबू चौधरी (वय २३) या तरुणीने घरात कोणीही नसताना गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली. आई गावातील एका लग्नसमारंभात गेली होती, तर वडील शेतात गेले होते. खुशबूच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. जिल्‍हा रुग्णालयात दाखल केल्यावर डॉ. विजय कुरकुरे यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. नातेवाईक कुटुंबीयांनी जिल्‍हा रुग्णालयात धाव घेत गर्दी केली होती. नशिराबाद पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

बाजारातून मोबाईल लंपास 
शहरातील पिप्राळा ते दादावाडी परिसरात बुधवारी भरणाऱ्या आठवडे बाजारातून दहा हजार रुपये किंमतीच मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. पोलिसात गुन्ह्यची नोंद करण्यात आली आहे. बांभोरी (ता.धरणगाव) येथील रहिवासी राजेंद्र शंकर कोळी (वय-३२) हॉटेल चालक असून ते बाजारातून भाजी पाला खरेदी करत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून मोबाईल चोरुन नेला. 

भवानी पेठेतून भंगार चोरी 
शहरतील शिवाजीनगर येथील रहिवासी प्रकाश पुरोहित यांच्या मालकीच्या जुन्या इमारतीचे काम भवानीपेठ येथे सुरु आहे. बांधकामावरुन आज्ञात चोरट्यांनी सहा हजारांचे भंगार साहित्य लांबवले आहे. प्रकाश भागचंद पुरेाहित (वय-५७) यांच्या मालकीच्या भावानी पेठेतील जुन्या इमारतीला तोडून तेथे नव्याने बांधकामाला सुरवात झाली आहे. जुन्या इमारतीचे निघालेले साहित्य, खिडक्या दरवाजे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरक्षीत रित्या सांभाळून ठेवण्यात आले असतांना चोरट्यांनी पत्री शेडचे कूलूप तोडून आतील जळवपास ३०० किलो जुने भंगार, असारीचे तूकडे, ९० किलो शाफ्ट रॉड, २० किलोचे वजनी माप असा एकुण ६ हजार ३०० रुपयांचा माल चोरुन नेल्या प्रकरणी शहर पेालिसांत अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news girl suicide home