लिफ्ट मागितली म्‍हणून कारमध्ये बसविले; पण घडले विपरीत चालकालाच मारत फेकले बाहेर

car robbery
car robbery

जळगाव : कार चालकास अडवून त्याच्या ताब्यातून कारसह ७ लाख ९० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली होती. वास्तविक कार चालकाने या दोघांना पहुर येथून लिफ्ट दिली आणि चालकाला मारहाण करुन देाघेही कार चोरुन पसार झाले. मात्र, सोबत घबाळ मिळाल्याने दोघा भामट्यांची लॉटरी लागल्याचे अटकेतील दिपक चव्हाण ऊर्फ डासमाऱ्या अप्पा याने सांगितले. त्याच्या साथीदाराचा गुन्हे शाखा शोध घेत आहे. 

एरंडोल येथील पद्मालय कॉलनीतील नाना नथ्थू पाटील (वय ६१) यांनी ओरक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची कार (क्र. एमएच ०२, ईआर ५३८२) भाड्याने चालवतात. या कारमधून ते मनोज गोकुळदास मानुधने (रा. एरंडोल) या साखर व्यापाऱ्याची इतर व्यापारी व दुकानदारांकडील पैशांची वसुली ते करीत असतात. नेहमीप्रमाणे ६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पाटील हे शेंदुर्णी, सोयगाव, गाडेगाव, उडनगाव व सिल्लोड येथून जमा केलेले ७ लाख ९० हजार रुपयांसह परतीचा प्रवास करतांना दोन तरुणांनी लिफ्ट मागितली. त्यांना बसवुन घेत वावडदा मार्गे एरंडोलकडे जातांना दोघांनी एकट्या नाना पाटीलला निर्जनस्थळी मारहाण करुन कार थांबवली. चालकाला खाली फेकुन कार घेवुन पळून गेले होते. 

रात्रभर पिच्छापुरवुन गुन्हा उघड 
घडल्या प्रकारात चालक खोटं बोलतोय असा भास पोलिसांना होता, मात्र, गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकालेंनी स्वतः फिर्यादीची चौकशी केल्यावर तथ्य समोर आले. फक्त बदनामी व मालकाच्या भितीने आपण लिफ्ट दिली असे कळू नये म्हणुन चार मारेकरी सांगितल्याचे कळाल्यावर सहाय्यक फौजदार रा. का. पाटील, विजयसिंग पाटील, विलास पाटील, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर अशांच्या पथकाने वसुलीवर गेलेल्या संपुर्ण रस्त्यावर 'ॲक्शन रिप्ले' करायला लावला. 

सीसीटीव्ही फुटेज अन्‌ संशयीत ताब्‍यात
म्हसावदच्या पेट्रोल पंपावर सिसीटिव्ही फुटेजमध्ये संशयीत आल्याने त्यांचा शोध सुरु होवुन दिपक साहेबराव चव्हाण ऊर्फ डासमाऱ्या अप्पा (रा.सामनेर ह.मु. गिरण ता. भडगाव) याला ताब्यात घेतले. पोलिस प्रसाद मिळताच त्याने चाळीस हजार रोख आणि साथीदार तुकाराम दिनकर पाटील ऊर्फ सोनू मोघ्या याचे नाव सांगितले. त्याच्या मागावर पोलिस भोपाळ, मध्यप्रदेशात शोध घेत असून त्यालाही लवकरच अटक होणार आहे. 

कार हवी होती..सोबत भेटले आठ लाख 
चोरट्यांना केवळ नवी स्वीफ्ट कार हवी होती. मात्र कार पळवल्यावर देाघेही गिरड गावी पेाहचले. सहज डिक्की उघडली त्यातील बॅगमध्ये पैसे पाहुन दोघेही अवाक‌ झाले. तू कारची विल्हेवाट लाव, मी पैसे लपवतो असे म्हणून तुकाराम पाटील ऊर्फ सेानू मोघ्या पसार झाला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com