काकाच्या लग्‍नाला आलेल्‍या मुलीसोबत घडले भयंकर; हातपाय बांधून अत्‍याचार

small girl torture
small girl torture

जळगाव : काकाच्‍या लग्‍नाला आलेल्‍या १६ वर्षीय अल्‍पवयीन मुलीचे हातपाय बांधून आणि तोंडाला रूमाल बांधून अत्‍याचार केल्‍याची घटना उघडकीस आली. संशयीताला जळगावातून ताब्‍यात घेण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील नेपानगर येथील युवती उचंदा गावातील भावाच्या लग्नासाठी मुलीचे आई-वडील कुटूंबीयांसह गावी आले होते. आई- वडीलांसोबत सदर युवती तीन दिवसांपासून मुक्‍कामी होती. त्याच लग्नासाठी संशयीत चेतन सोनार हा देखील आईसोबत आलेला होता. आदल्या दिवसा पासूनच तो, पिडीतेवर लक्ष ठेऊन होता.

पिडीता एकटी असल्‍याची साधली संधी
दरम्‍यान सोमवारी सदर युवती गावातील नातेवाईकांच्या घराजवळील गिरणीत राहिलेली तिची चपपल घेण्यासाठी गेली होती. येथेच चेतन रवींद्र सुतार (वय २०) याने युवती एकटी असलेल्‍या संधीचा फायदा घेत गिरणीचा दरवाजा बंद केला तसेच युवतीचे हातपाय बांधून व तोंडाला रुमाल बांधून अत्याचार केला. गिरणीत पत्र्यांचा आवाज झाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळ गाठल्यावर हा प्रकार उघड झाला होता. यानंतर चेतन पसार झाला. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून चेतन सुतार विरूद्ध अॅट्रॉसिटी आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

संशयीताला जळगावात अटक 
संशयित चेतन रविंद्र सुतार हा जळगाव शहरातील इच्छादेवी चौकी मागील तांबापुरा झोपडपट्टीत लपल्याची माहिती निरीक्षक सुरेश शिंदे यांनी एमआयडीसी पेालिसांना कळवली, उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, विजय बावस्कर, किशोर पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील यांना मिळाल्यावरुन संपुर्ण परिसर पिंजुन काढत संशयीताला अटक करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com