झोपेत असताना पत्‍नीने केला पतीचा खून

murder case
murder case

जामनेर (जळगाव) : गोंडखेळ (ता. जामनेर) येथील विवाहितेने पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पतीला गळफास देवून खून केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. मयताच्या बहिणीने दिलेल्‍या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंडखेळ येथे मयत दिलीप विश्‍वनाथ सोनवणे (वय ३५) आणि संशीयीत आरोपी असलेली संगीता सोनवणे हे दोघे पती- पत्नी वास्‍तव्यास होते. मयत पती हा संशयीत आरोपी पत्नी संगीतावर संशय घेवून पाप लावत असल्‍याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दोघांमध्ये बऱ्याचदा वाद देखील होत होते. 

रात्री झोपेत असतानाच..
पती आपल्‍यावर कायम संशय घेत असल्‍याचा राग पत्‍नीच्या डोक्‍यात होता. या कारणावरून संगीताने पती रात्री झोपलेला असतांना दोरीने गळफास लावून खून केल्‍याचा आरोप आहे. सदर घटना रात्री अकरा- साडेअकराच्या सुमारास घडली असून याबाबत मयत पतीच्या बहिण कल्पना युवराज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी पत्नीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत संगिता हिस अटक करण्यात आली असून पो.नि. प्रताप इंगळे यांच्या अख्त्यारीत पुढील तपास सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com