crime
crime

तक्रार दिल्‍याचा राग; भर चौकात डोक्‍यात घातला दगड

जळगाव : घरासमोर असलेली आसारी चोरी केल्याचा संशय व्यक्त करत पोलीसात तक्रार दिल्याचा राग आल्याने दोघांनी तरूणाला दगडाने डोक्याला मारहाण करत जखमी केले. सदर घटना इच्छादेवी चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ईच्छादेवी मंदीराच्या मागील तांबापूरा परिसरात राहणाऱ्या ईश्वर सीताराम पाटील (वय ४०) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी घराचे किरकोळ बांधकाम करण्यास सुरवात केली आहे. याकरीता त्‍यांनी लागणारे साहित्‍य आणले आहे. यातील आसारी अंगणात ठेवली आहे. दरम्यान १० एप्रिलला सकाळी ८ वाजता त्यांच्या अंगणात ठेवलेली असारी चोरल्याचा संशय गल्लीत राहणारे गणेश गोविंद मिस्तरी आणि ललित मिस्तरी (दोघे रा. इच्छादेवी मंदीराच्या पाठीमागे) यांच्यावर व्यक्‍त केला. 

दोघांनी साधली संधी
आसारी चोरी प्रकरण ईश्‍वर पाटील यांनी पोलीसात तक्रारही केली होती. पोलिसात तक्रार दिल्‍याचा राग आल्याने संशयित आरोपी गणेश आणि ललित यांनी ईश्‍वर पाटील यांना इच्छादेवी चौकासमोर एकटे गाठत त्‍यांच्या डोक्यात दगड टाकून दुखापत केली. ईश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com