esakal | गावठी दारूभट्ट्या उद्‌ध्वस्त; नऊ संशयितांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Village distilleries destroyed

गावठी दारूभट्ट्या उद्‌ध्वस्त; नऊ संशयितांना अटक

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : शहरातील जाखनीनगर (कंजरवाडा) भागाला एमआयडीसी पोलिस (jalgaon police) ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, शीघ्र कृतिदलाचे जवान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आदींनी संयुक्तिक पहाटे पाचला वेढा देत येथील दारूभट्या (distilleries destroyed) उद्ध्वस्त केल्या. दारूचे रसायन गटारींमध्ये वाहते केले. (distilleries destroyed jalgaon midc police)

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक विशाल वाठोरे, रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, तुकाराम निंबाळकर, राजेंद्र सैंदाणे, गणेश शिरसाळे, सिद्धेश्वर लटपटे, नामदेव पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, साईनाथ मुंढे, सचिन पाटील, महिला पोलिस नाईक निलोफर सय्यद, राजश्री बाविस्कर, आशा पांचाळ आदींच्या पथकासह शीघ्र कृतिदलाच्या जवानांनी जाखनीनगर भागाला चहूबाजूंनी वेढा दिला. रहिवासी साखरझोपेत आणि दारूनिर्मिती करणारे कामात व्यस्त असताना नुकत्याच सुरू केलेल्या दारूभट्ट्या उद्‌ध्वस्त केल्या. राखी गुमाने, रेखा कंजर, आशा बाटुंगे, रिना गुमाने, बिजनाबाई बाटुंगे आदींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या पाचही संशयितांकडून एक लाख ३२ हजार ५०० रुपयांचे कच्चे रसायन जप्त करून ते गटारीत वाहते केले.

हेही वाचा: success story : शेतकरीपुत्र झाला इंजिनिअर पण धडपड बळीराजासाठीच; ‘हवामान’ ॲप ठरणार वरदान

साठ हजाराचे रसायन नष्‍ट

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत कंजरवाडा, जाखनीनगर, तांबापूर खदान, सिंगापूर या ठिकाणी धाडी टाकून रसायन व इतर साहित्य नष्ट करण्यात आले. यात बेबीबाई बाटुंगे (रा. तांबापुरा), प्रेमाबाई कंजर (रा. जाखनीनगर), नीलमबाई बाटुंगे (रा. तांबापुरास खदान), मुन्नीबाई बागडे (तांबापुरा खदान) यांच्या कब्जातून जवळपास साठ हजारांचे कच्चे रसायन जप्त करून नष्ट केले. चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, संजय पवार, अनिल जाधव, अनिल इंगळे, प्रदीप पाटील, अनिल देशमुख, वसंत लिंगायत, गोरख बागूल, सूरज पाटील, पोलिस नाईक प्रवीण मांडोळे, सचिन महाजन, परेश महाजन, वैशाली सोनवणे आदींनी ही कारवाई केली.