ना पावती ना बिल..बोगस बीटी बियाण्यांचा काळा बाजार

ना पावती ना बिल..बोगस बीटी बियाण्यांचा काळा बाजार
cotton seeds
cotton seedscotton seeds

चोपडा (जळगाव) : तालुक्यात गुजरात ४ जीबीटी या नावाने बोगस बियाण्यांचा (Duplicate cotton seeds) सर्रास काळा बाजार सुरू असून, कुठलेही बिल नाही, पावती नाही, कंपनीचे नाव नाही, लॉट क्रमांक नाही, असे असतानाही एक बॅग (पॅकेट) एक हजार १०० रुपयांपासून एक हजार ५०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. भविष्यात या बियाण्यांविषयी शेतकऱ्यांना (Farmer) अडचणी आल्यास त्यांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्‍न त्यामुळे निर्माण होत असून, विक्रेत्यांचे व अधिकाऱ्यांचे यात पाकिटामागे अर्थपूर्ण साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, तालुक्यात भरारी पथके नावालाच असल्याचे दिसून येत आहे. (agriculture market duplicate cotton seeds sell)

अधिकृत बियाणे विक्री २५ मेनंतर सुरू होणार असल्याचे शासनाचे आदेश असताना शेतकऱ्यांना बियाणे कोठून उपलब्ध होत आहे? शहरासह ग्रामीण भागातील दुकानदार बियाणे पाठवून सर्रास विक्री करीत आहेत. शहरातीलच काही विक्रेते ग्रामीण भागात बियाणे पुरवठा करीत असून, या विक्रीत मिलीभगत असल्याचे बोलले जात आहे. हा सर्व प्रकार भरारी पथकांना दिसत नाही का, असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत. तालुक्यात एक लाख पाकिटांची विक्री करण्याचे टार्गेट या विक्रेत्यांनी ठेवले आहे.

cotton seeds
मुलगी झाली हो..म्‍हणून त्‍यांनी काय काय केले!

अधिकृत कंपनीचे बियाणे १ जूनपासून

शेतकऱ्यांनीच याबाबतीत सावध होणे गरजेचे आहे. शासनाने आता तापमानामुळे व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अधिकृत कंपनीचे बी. टी. बियाणे साधारण १ जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगूनही काही शेतकरी लागवडीची घाईगर्दी करीत आहेत. त्यामुळे त्यांनी बोगस बियाणे विकत घेत आतापर्यंत लागवड क्षेत्राच्या जवळपास ५० टक्के कापसाची लागवड झाल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा बीटी कपाशीकडे कल

चांगल्या व भरघोस उत्पादनासाठी शेतकऱ्यांचा कल बीटी कपाशीचे बियाणे खरेदी करण्यावर असतो; परंतु त्यांच्या माथी बोगस बियाणे मारले जाण्याची शक्यता आहे. हे बियाणे निम्म्या किमतीत मिळते. पण, अशा बियाण्यांना शासनाने विकण्याची परवानगी दिलेली नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, बियाणे तसेच, कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नसतो. तरीही या बीटीची काही वर्षांपासून सर्रास विक्री होत आहे. मागील वर्षी कृषी विभागाने काही विक्रेत्यांवर थातुरमातुर कारवाई केली असली, तरी या वर्षी मात्र या बोगस बियाण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.

cotton seeds
खानदेशपुत्राचा सातासमुद्रापार कर्तृत्वाचा झेंडा.. संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारची मान्यता !

धाडी नावालाच

दर वर्षी जिल्हा कृषी अधीक्षक बोगस बियाण्यांसंदर्भात जिल्हाभरात भरारी पथके नियुक्ती करतात. तरीही बोगस बियाणे विक्री होतेच. मग ही पथके नावालाच आहेत की काय? पथकांची काहीतरी कारवाई दिसावी, कागदावर काहीतरी यावे यासाठी पथकातील अधिकारी कृषी दुकानांवर पाच ते सहा ठिकाणी धाडी टाकतात. यात कागदावर आलबेल दाखवून सेंटलमेंट करून सर्व काही कागदांवरच राहते. धाड फक्त नावालाच राहते. या सर्व प्रकारात गरीब शेतकरी मात्र नाहक नाडला जातो.

अधिकृत विक्रेत्यांना त्रास

शासनाच्या आदेशानुसार गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अधिकृत ब्रँडेड कंपनीचे बियाणे २५ मेनंतरच विक्रीला सुरवात होते. तेव्हा हे अधिकारी अधिकृत बियाणे विक्रेत्यांना त्रास देत असल्याची माहिती एका कृषी विक्रेत्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com