दाद मागण्यासाठी तरूणी पोलिस ठाण्यात; पण पोलिसाच्या असभ्‍य वर्तनाचे फेसबुक लाईव्ह करत गृहमंत्र्यांचा टॅग

facebook
facebook

जळगाव : अन्यायासंबंधी दाद मागण्यासाठी गेले असताना शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांनी आपणास व अन्यायग्रस्त तरुणीस अश्‍लील शिवीगाळ केल्याचा आरोप करत, संबंधित तरुणींनी पोलिस ठाण्यातूनच फेसबुक लाइव्ह करत गृहमंत्र्यांनाच व्हिडिओ टॅग केला. त्यावर पोलिसांविरुद्धचा रोष नेटिझजन्सने व्यक्त केला. मात्र, पीडितेच्या न्यायाचा प्रश्‍न अद्याप अनुत्तरितच असून, ४८ तास उलटूनही यंत्रणेने याबाबत कुठलीही पावले उचललेली नाहीत. 

पहिलीशी प्रेमविवाह आता दुसरा साखरपुडा
अकोला येथे आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला जळगाव शहरातील प्रतीक भाऊलाल आगळे याने लग्नाचे आमिष दाखवत पळवून आणले होते. अकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहरूणमधील मंदिरात लग्न लावून घेत, फोटोसेशन करून घेतले. नंतर काही महिन्यांत तिचे वय पूर्ण झाल्यावर दबाव आणून लग्न झाल्याबाबतचे पुरावे आणि तिचे लेखी म्हणणे संबंधित पोलिस ठाण्यात पाठवल्याने दाखल गुन्हा फायनल करण्यात आला होता. या लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतर मात्र प्रतीकने मुलीला मारझोड करून घरातून हकलून लावले. नुकतेच त्याच्या कुटुंबीयांनी प्रतीकचे दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केल्याची बाब लक्षात आल्याने पीडिता सिमरन प्रतीक आगळे हिने पोलिस ठाणे गाठले. 

पोलिसांचीच तक्रार..
पीडिता सिमरन आणि वैशाली झाल्टे अशा दोघीही तक्रार घेऊन शनिपेठ पेालिस ठाण्यात गेल्या होत्या. त्या वेळी निरीक्षक विठ्ठल ससे यांनी संपूर्ण प्रकरण ऐकून घेतले. मुलाकडील मंडळींना बोलावून त्यांच्याशी चर्चा केल्यावर मात्र तक्रार नोंदविण्याऐवजी पीडितेलाच असभ्य भाषेत सुनावले अन्‌ परतवून लावले. 

गृहमंत्र्यांकडे तक्रार..
या प्रकारानंतर वैशाली यांनी पोलिस ठाण्यातूनच फेसबुक लाइव्ह करून ते गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार सुप्रिया सुळे यांना टॅग केले. इतकेच नाही, तर गृहमंत्र्यांना दूरध्वनी करुरून त्यांच्या स्वीय सहाय्यकाला घडलेला प्रकार सांगून निरीक्षकांची तक्रार केली. आज या प्रकरणी दोन्ही तरुणींनी जिल्‍हाधिकारी कार्यालय गाठून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली.  

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com