लाकूडमाफिया आवळल्‍या मुसक्‍या; वन विभागाची कारवाई

forest department
forest department

चोपडा (जळगाव) : शहरातील मन्यारमळी, हमीदनगर भागांत मिळालेल्या माहितीवरून चोपडा व यावल वन विभागाच्या वनपरिक्षेत्राच्या फिरत्या पथकाने छापा टाकला. तेथून १३ घनमीटर लाकूड व १८ इंच व्यासाचे विनापरवाना उभे आरायंत्र जप्त केले. या कारवाईमुळे अवैध लाकूड व्यापारी तथा व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. 
वनसंरक्षक धुळे (प्रादेशिक) डी. डब्ल्यू. पगार व यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक पद्मनाभा एच. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एच. पवार, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. व्ही. कुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) डी. एच. लोंढे व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या पथकाने बुधवारी (ता. १०) सकाळी दहाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मन्यार मळी, हमीदनगर भागात छापा टाकला. शेख मुख्तार शेख युसूफ (रा. मन्यार मळी, हमीदनगर, चोपडा) यांच्याकडे बांबूळ, निलगिरी, नीम व इतर असे एकूण १३ घनमीटर लाकूड आढळून आले. ते जप्त करून मुख्य विक्री केंद्र चोपडा येथे जमा केले. तसेच १८ इंच व्यासाचे विनापरवाना उभे आरायंत्र आढळले. सहाय्यक वनसंरक्षकांच्या समक्ष व वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) यांच्या उपस्थितीत पंचनामा करून तेही जप्त करण्यात आले. ही कारवाई सकाळी दहापासून ते दुपारी चारपर्यंत पूर्ण करण्यात आली. या कारवाईनुसार वन गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. वनरक्षक जी. के. गोपाळ, डी. पी. देवरे, सारिका कदम, बाळासाहेब नलावडे, के. एल. धनगर, पोलिस कर्मचारी सचिन तडवी, वाहनचालक योगिराज चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com