दिल्लीतील उद्योजिकेची फसवणूक; पैसे मागण्यासाठी आले तर दिली धमकी 

fraud case
fraud case

जळगाव : खानदेश क्रॉकरीज‌ या शोरूममालकाने नोएडा (दिल्ली) येथील महिला उद्योजकाचा विश्वास संपादन करून १५ लाखांचा गंडा घातला. पैसे मिळत नसल्याने जळगावी धडकलेल्या महिला उद्योजकाला सय्यद हारून याच्यासह त्याच्या मुलांनी गोळी मारण्याची धमकी दिली. शिखा अग्रवाल यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
खुर्जा (बुलंदशहर, उत्तर प्रदेश) येथील शिखा अग्रवाल (वय ४४) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा चिनीमातीची भांडी, कपबश्या निर्मितीचा कारखाना व नोएडात होलसेल उद्योग आहे. खानदेश क्रॉकरीज‌चे संचालक अल्तमश सईद हारून यांनी शिखा इंडस्ट्रीजला संपर्क केला. जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दूरदर्शन टॉवरसमोरच माझे खानदेश क्रॉकरीज हे शोरूम असल्याचे सांगत मालाची ऑर्डर दिली. नोव्हेंबर २०२० मध्ये दहा लाख सात हजार ५७४ रुपयांचा माल पाठविण्यात आला होता. तद्‍नंतर लगेचच अल्तमशने पुन्हा संपर्क करून पाच लाखांचा माल मागविला आणि दोन्ही ऑर्डरची रक्कम सोबतच देतो, असे सांगितले. पंधरा लाखांचा माल आल्यानंतर मात्र खानदेश क्रॉकरीज कंपनीकडून फोन स्वीकारणेच बंद झाले. व्यवस्थापक मोहम्मद अल्ताफ मिर्झा यांना कंपनीने पैसे घेण्यासाठी पाठविले. मात्र, तरीसुद्धा पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर कंपनीमालकांनीच जळगाव गाठले. 

जलगाव आते बहोत.. जाते कम हैं! 
शिखा इंडस्ट्रीज‌च्या संचालिका शिखा अग्रवाल पती नीरज यांच्यासह जळगावी आल्या. पैशांची मागणी केल्यावर सईद हारून, अल्तमश, त्याचा भाऊ फैसल अशांनी पैसे नसल्याचे सांगत दमदाटी करून शिवीगाळ केली. ‘जलगाव में लोग आते बहोत हैं, लेकिन जाते कमही, हैं!’ असा फिल्मी डायलॉग मारून इशाऱ्याने गोळी मारण्याची धमकी दिली. 

पैसे देण्यास नकार..
शिखा अग्रवाल यांनी तिघा मुलांसह त्यांचा पिता सईद हारून याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. पूर्वी पैसे देण्यास नकार देणाऱ्या खानदेश क्रॉकरीज‌कडून सुरवातीला ५० हजार महिना देण्याचा डाव खेळला, नंतर आम्ही चार लाख देतो, मागचा हिशेब विसरून जा, असे सांगण्यात आले. मात्र, तक्रारदारांकडे ठोस पुरावे उपलब्ध असल्याने गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, निरीक्षक प्रताप शिकारे यांनी स्वतः तपासून अटकेच्या सूचना केल्या. बाप-लेकांनी अग्रवाल यांना १५ लाख देत नाहीत, उलट कोर्टात खर्च करू, असे सांगितले. 

जमिनीवर झोपून रडबोंबल 
अल्तमश सईद हारून याला अटकेची खात्री होताच त्याने गोंधळ घातला. हारूनने जमिनीवर पडून हातपाय झटकत डोळे बंद केल्याने त्याच्या मुलांनी पोलिस ठाण्यातच तक्रारदार महिलेस परत ठार करण्याची धमकी दिली. वैद्यकीय तपासणीला नेण्यापूर्वीच हा तमाशा सुरू होता. त्यानंतर आरोपींना तपासणीसाठी नेण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com