जनमत नाही म्‍हणून जिथे गर्दी तिथे काँग्रेस सहभागी : माजी मंत्री गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

शेतकरी संबंधीचे बिल किती हिताचे आहे; हे सर्वांना माहित आहे. हा प्रश्‍न केवळ पंजाबपुरता आहे. महाराष्‍ट्रात कम्‍युनिष्‍ठांनी मुद्दा हातात घेतला आहे.

जळगाव : शेतकरी बिलाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा केवळ पंजाबचा प्रश्‍न असून महाराष्‍ट्रात केवळ कम्‍युनिस्‍ट पक्षांनी मुद्दा हाती घेतला असून तेच मोर्चे काढत आहे. त्‍यांच्या मागे काँग्रेस फिरत असून ‘बेगाने शादी मे अब्‍दुल्‍ला दिवाना’ अर्थात जिथे गर्दी दिसेल तिथे काँग्रेस फिरत असल्‍याचे म्‍हणते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसला टोला लगावला.
प्रजासत्‍ताक दिनानिमित्‍ताने जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्‍पबचत भवन येथे आयोजित कार्यक्रमानंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्‍यांनी शेतकरी बिलासंबंधी बोलताना आपले मत मांडताना काँग्रेसवर निशाणा साधला. माजी मंत्री महाजन म्‍हणाले, की शेतकरी संबंधीचे बिल किती हिताचे आहे; हे सर्वांना माहित आहे. हा प्रश्‍न केवळ पंजाबपुरता आहे. महाराष्‍ट्रात कम्‍युनिष्‍ठांनी मुद्दा हातात घेतला आहे. तेच मोर्चे काढत असून त्‍यांच्या मागे काँग्रेस फिरत आहे. कारण काँग्रेसच्या मागे स्‍वतःचे जनमत नाही; यामुळे गर्दी बघितली तर आपण सहभागी असल्‍याचा प्रकार काँग्रेस करत आहे. परंतु, शेतकरी बिल हे सर्वांच्या हिताच्या असून ते ठराविक मंडळींना पाहवत नसल्‍याचे महाजन म्‍हणाले.

विरोधात काम करत आलोय
आमच्याकडे सत्‍ता असो की नसो पण कुठल्‍याही परिस्‍थितीत काम करण्याची सवय आहे. कारण वीस वर्ष विरोधातच काम केले आहे. त्‍यावेळी देखील काम करून निवडून आलो आहे. यामुळे आता देखील सत्‍तेत नसलो तरी काम करत राहणार असल्‍याचे महाजन म्‍हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news girish mahajan bjp congress farmer bill