माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनाही धक्‍का; नाडगावात भाचेसून पराभूत

pratibhatai patil
pratibhatai patil

जळगाव : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे जिल्हयातील बोदवड तालुक्यातील नाडगाव हे गाव आहे. या ठिकाणी त्यांच्या भाचेसून ईश्‍वरचिठ्ठीने पराभूत झाल्या आहेत. 

नाडगाव (ता. बोदवड) येथे कॉंग्रेसची सत्ता होती. या ग्रामपंचायतीत माजी राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे भाचे तथा कॉंग्रेसचे नेते नाडगाव येथील माजी पंचायत समिती सभापती विरेंद्रसिंग पाटील यांच्या पत्नी रंजनाकौर विरेंद्रसिंग पाटील यांनी कॉंग्रेसच्या पॅनेलतर्फे उमेदवारी होती. त्यांच्या विरोधात अपक्ष योगिता श्रीकृष्ण लसूनकर यांची उमेदवारी होती. 

मतांची बरोबरी पण
एकमेकांविरोधात असलेल्‍या दोन्ही उमेदवारांना ३०२ अशी सारखी मते पडली. यामुळे एका उमेदवाराला विजयी करण्यासाठी ईश्‍वर चिठ्ठी कढण्यात आली. त्‍यानुसार काढण्यात आलेल्‍या ईश्‍वरचिठ्ठीत रंजनाकौर विरेंद्रसिंग पाटील या पराभूत झाल्या. त्यांचा पराभव हा कॉंग्रेसला धक्का मानला जात आहे. 
 
कॉंग्रेसचे पॅनलही पराभूत 
नाडगाव ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा होता. मात्र आज घोषित झालेल्‍या निवडणूकीच्या निकालात कॉंग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडाला आहे. ग्रामंपचायतीत एकूण सात जागा असून सहा जागेवर विरोधी उमेदवार विजयी झाले आहेत. माधुरी गवळे या कॉंग्रेसच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. विरोधी भाजप, शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com