विधानसभा निवडणुकीत पडले अन्‌ आता ग्रामपंचायतीतही नागरीकांनी नाकारले

ravi deshmukh
ravi deshmukh

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रीया आज झाली. जळगाव तालुक्यात धक्कादायक निकाल लागले असून यात शिवसेनेसह भाजपा तालुकाध्यक्षांना कानळदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव सहन करावा लागला आहे. विधानसभा निवडणूक लढविलेला उमेदवार देखील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाले आहे. 

जि.प.चे माजी सभापती देखील पराभूत
कानळदा ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्र.१ व ६ मध्ये शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, पत्नी निता चव्हाण (माजी जि.प महिला बालकल्याण सभापती) व पुत्र ऋषी चव्हाण या तिघांना पराभूत व्हावे लागले आहे. राजेंद्र चव्हाण यांचा पराभव सेवानिवृत्त डीवायएसपी पुंडलीक सपकाळे यांनी केला आहे. तसेच कानळदा येथीलच भाजपाचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तिरंगी लढतीत त्यांना दारुण पराभव सहन करावा लागला.

विधानसभेत पडल्‍यानंतर आता..
असोदा येथील निवडणुकीत रवि देशमुख यांचा देखील पराभव सहन करावा लागला आहे. यापुर्वीच त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. विद्यमान जि.प. सदस्या पल्लवी देशमुख यांचे ते पती आहे. असोदा येथील सामाजिक व चळवळीचे कार्यकर्ते किशोर चौधरी हे देखील ग्रा.पं निवडणुकीत पराभूत झाले आहे. तालुक्यात अनेक जुन्या धुरंधरांना पराभवाचा सामना करावा लागला असुन यंदा नवख्यांना संधी मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com