भडगाव तालुक्यात ‘महिलाराज’; २६ महिला होणार सरपंच 

gram panchayat sarpanch reservation
gram panchayat sarpanch reservation

भडगाव : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी (ता. २८) सरपंच पदासाठी तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आरक्षण सोडत काढण्यात आले. आरक्षणानंतर ‘कही खुशी कही गम’ चित्र पाहायला मिळाले. पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुपारी बाराला आरक्षण काढण्यात आले. 
भडगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ३३ ग्रामपंचायतींसह इतर १६ ग्रामपंचायतींचेही आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसूचित जातीसाठी पाच, अनुसूचित जमातीसाठी ८ ‌तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १३ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण आरक्षित झाले. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. आरक्षणानंतर काहींचा हिरमोड झाला तर काहींच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला. यातील २५ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. आर्यन राठोड या सात वर्षीय बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लखवाल, विस्तार अधिकारी टी. पी. मोरे, अजिंक्य आंधळे आदी उपस्थित होते. 

सर्वसाधारण २३ 
तालुक्यातील तब्बल २३ ग्रामपंचायतींचे पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यात पथराड, पासर्डी, पळासखेडे, मांडकी, लोण प्र.भ., शिवणी, आडळसे, आंचळगाव, वलवाडी बुद्रुक, वाक, बोदर्डे, बांबरुड प्र. ऊ., बांबरुड प्र. ब., बात्सर, भट्टगाव, पिंपरखेड, गुढे, निंभोरा, गोंडगाव, कजगाव, कोठली, कनाशी, वाडे यांचा समावेश आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिदंळे, मळगाव, आमडदे, भातखंडे बुद्रुक, पिंपळगाव बुद्रुक, लोण प्र. ऊ., सावदे, पांढरद, वडगाव - नालबंदी, भोरटेक बुद्रुक, तांदुळवाडी, बाळद खुर्द, बोरनार ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाले आहे. अनुसूचित जातीसाठी अंजनविहिरे, शिंदी, पिप्रिंहाट, घुसर्डी खुर्द, पिचर्डे गावाचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. अनुसूचित जमातींसाठी अंतुर्ली बुद्रुक, खेडगाव खुर्द, वरखेड, कोळगाव, जुवार्डी, वडगाव बुद्रुक, गिरड, वडजी ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित झाले आहे. 

२६ महिला होणार सरपंच 
भडगाव तालुक्यात तब्बल २६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिला विराजमान होणार आहेत. दुपारी चारला प्रातांधिकारी राजेंद्र कचरे यांच्या उपस्थित महिलांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसूचित जातीसाठी शिंदी, पिप्रिंहाट, पिचर्डे अनुसूचित जमातीसाठी अंतुर्ली बुद्रुक, खेडगाव खुर्द, कोळगाव, जुवार्डी, नागरिकचा मागास प्रवर्गातील आमडदे, भातखंडे बुद्रुक, पिंपळगाव बुद्रुक, सावदे, वडगाव नालबंदी, भोरटेक बुद्रुक, बाळद खुर्द तर सर्वसाधारण प्रवर्गातील बांबरुड प्र. ब., भट्टगाव, गुढे, निंभोरा, कनाशी, पासर्डी, मांडकी, शिवणी, आंचळगाव, वलवाडी बुद्रुक, बोदर्डे, बांबरुड प्र. ऊ. ग्रामपंचायत महिलांसाठी राखीव निघाले आहे. 
 
संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com