महामार्गावर रोजच जीव जाताय; आज तर वडीलांना रिक्षातून बघितले; काही क्षणात फोन वाजला अन्‌

accident
accident

जळगाव : शहरातील शिव कॉलनीजवळच्या रेल्वे उड्डाण पुलावर भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एका महापालिका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २६ डिसेंबर रोजी ३ वाजेच्या सुमारास घडली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नंदनवन कॉलनीतील रहिवासी, नारायण मांगो हटकर (वय-५८) रा. नंदनवन कॉलनी हे महानगरपालिकेत पुरवठा विभागात कार्यरत असून शहरात पाणी सोडण्याचे काम करतात. आज सकाळी १० वाजता कामावर हजर झाले कार्यालयीन कामासह आज दुपारी केाल्हेनगर परिसराचा पाणि पुरवठ्याचा दिवस असल्याने दुपारी पाणी सेाडले काम अटोपल्यावर दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीई ३१०८) ने घरी नंदनवन कॉलनीत येथे जेवणासाठी जात असतांना शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळ मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यात ते गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. 

बाप-लेकाची अखेरची भेट 
नारायण हटकर यांचा मुलगा पवन रिक्षा चालक आहे. दुपारी तो बहिणीला घेवून बाजारात येण्यासाठी निघाला असतांना शिवकॉलनीजवळ त्याचे बाबा घरी जेवणासाठी जात असतांना भाऊ- बहीणीने बघितले. दोघांत चर्चा होत नाही; तोवर थोड्या वेळाने पवनला अपघाताचा फोन आला. त्याने तातडीने रिक्षा वळविली व अपघातस्थळी धाव घेतली. वडील जखमी पडल्याचे दिसताच मुलगी आशा आणि मुलगा पवन यांनी तत्काळ जखमी अवस्थेत नारायण हटकर यांना रिक्षात टाकून खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पुर्वीच त्यांचा वाटेतच प्राणज्योती मालविली होती. जिल्हा शासकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

प्रशासन ढिम्मच 
एक दिवसापुर्वीच गुरुवार(ता.२४) रोजी लिना तळेले या गृहीणीचा याच महामार्गावर बॉम्बे बेकरी जवळ अपघाती मृत्यु झाला. महामार्गावरील खड्डे, विस्तारीकरणाच्या कामातील असख्य चुका, दिवा बत्तीची सोय नसणे आणि विशेष म्हणजे अवजड वाहनांवर वाहतुक शाखा, आरटीओ विभागाचे नियंत्रण नसणे या मुळे रोजच प्राणांतीक अपघात होवुन निरपराध्यांना जीव गमवावा लागत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com