महामार्ग चौपदरीकरणात कोरोनाचा ‘स्पीडब्रेकर’

१ एप्रिलपासून निर्बंध आहेतच, शिवाय बुधवारी रात्रीपासून राज्यात कठोर निर्बंध लागू होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बाजारपेठेसह सर्वच क्षेत्र प्रभावित झाली आहेत.
jalgaon highway fourwau work
jalgaon highway fourwau workjalgaon highway fourwau work

जळगाव : कोरोना संसर्गामुळे एकीकडे रुग्ण त्रस्त असून, बाजारपेठ ठप्प झालेली असताना कठोर निर्बंध लागण्यापूर्वीच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला कोरोनाचा ‘स्पीडब्रेकर’ लागला आहे. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांच्या कंत्राटदार कंपन्यांमधील कर्मचारीही बाधित आढळून आले असून, दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरूच आहे. महिनाभरापासून कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये मोठी वाढ झालीय. राज्यभर हीच स्थिती असल्याने १ एप्रिलपासून निर्बंध आहेतच, शिवाय बुधवारी रात्रीपासून राज्यात कठोर निर्बंध लागू होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बाजारपेठेसह सर्वच क्षेत्र प्रभावित झाली आहेत.

महामार्गाचे कामही प्रभावित

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. फागणे- तरसोद, तरसोद- चिखली व जळगाव शहरातील साडेसात किलोमीटर असे तीन टप्पे सध्या प्रगतिपथावर आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने ही कामेही प्रभावित झाली आहेत.

फागणे-तरसोदचे काम

फागणे-तरसोद या टप्प्यातील काम अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर या एजन्सीकडे आहे. तरसोदपासून पाळधीपर्यंतच्या वळणरस्त्याचे (बायपास) काम सध्या प्रगतिपथावर आहे. पाळधी ते पारोळादरम्यानही तीन-चार ठिकाणी काम सुरू आहे.

दोघांचा कोरोनाने बळी

या एजन्सीकडील पथकातील काही कर्मचारी कोरोनाबाधित आढळले असून, दोघा कर्मचाऱ्यांचा बळीही गेल्यामुळे काम प्रभावित झाले आहे. सध्या तीनशे कामगार विविध ठिकाणी कामावर आहेत. बाजारपेठ बंद व लॉकडाउनच्या धास्तीने काही मजूर त्यांच्या गावी निघून गेल्याने कामाची गती मंदावली आहे.

शहरातील कामही थंड

जळगाव शहरात खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंतचे काम प्रगतिपथावर आहे. अंडरपासून, भुयारी मार्गाचे काम या टप्प्यात सुरू आहे. मात्र, कोरोनामुळे या कामावरील काही मजूर बाधित आढळून आल्यानंतर या कामाचा वेगही कमी झाला आहे.

काही दिवसांपासून कोरोचा संसर्ग वाढल्याने कंत्राटदाराकडील काही कर्मचारी, मजूर बाधित आढळून आले. काही कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे कामाच्या गतीवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसते.

- सी.एम. सिन्हा, प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com