शिवसेनेकडून महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल; आपल्‍या दाव्यावर सेना ठाम

jalgaon corpopration
jalgaon corpopration

जळगाव : महापालिकेत सुरू असलेल्‍या फोडाफोडीच्या राजकारणानंतर महापौर पदासाठी दावा करणाऱ्या शिवसेनेकडून आज अर्ज दाखल करण्यात आला. भाजपच्या अर्जाची मात्र अजून प्रतिक्षा आहे.

शिवसेना-एमआयएमसह आता भारतीय जनता पक्षातून फुटून आलेल्या सदस्यांसह शिवसेनेसोबत सद्य:स्थितीत ४४ सदस्य असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून नाव निश्‍चित करण्यात आले असून सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्यात आला. महापौरपदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्‍णू भंगाळे, शरद तायडे, अमर जैन, सुनील महाजन आदी नगरसेवक उपस्‍थित होते.
 
म्‍हणूनच सेना आहे ठाम
जळगाव महापालिकेत ५७ सदस्यांसह स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. शिवाय, सेनेला ‘एमआयएम’च्या तीन सदस्यांचाही पाठिंबा मिळणार असल्याने गुरुवारी (ता.१८) होणाऱ्या महापौर निवडीत सेनेची सरशी होईल, असा दावा केला जात आहे. ७५ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ३८ सदस्यसंख्या हवी. सध्या आमच्याकडे शिवसेनेचे १५, एमआयएमचे तीन आणि भाजपतील २६ अशा एकूण ४४ सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेना करत आहे.

भाजपची प्रतिक्षा
भाजपचे २७ नगरसेवक फुटल्‍याने मोठी खिंडार पडली आहे. यामुळे भाजपजवळ महापौर पदासाठी दावा करण्यासाठी स्‍पष्‍ट असे बहुमत नाही. तरी देखील भाजपकडून महापौरपदासाठी आम्‍ही दावेदार असल्‍याचे सांगितले जात आहे. मात्र शिवसेनेकडून अर्ज दाखल झाला असून, भाजपकडून अद्याप अर्ज दाखल करण्याची प्रतिक्षा आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com